हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता कमाल रशीद खान दररोज चर्चेचा विषय बनत असतो. कमाल खान नेहमीच त्याच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण करताना दिसत असतो. नेहमी कोणत्यातरी अभिनेत्यावर टिका करुन चर्चेत राहणाऱ्या कमाल खानने आता अभिनेता राजकुमार रावच्या चित्रपटाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. कमाल रशीद खानने अभिनेता राजकुमार रावला घेरले आहे. ज्यामध्ये त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या हिट-द फर्स्ट केसच्या कलेक्शनची खिल्ली उडवली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, कमाल रशीद खानने बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावची खिल्ली उडवली आहे. याच आधारावर नुकतेच केआरकेने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे ज्यामध्ये “माझा भाऊ राजकुमार राव 100 कोटी विसरून जा, तुमचा चित्रपट 10 कोटीही कमावत नाही. हे हतबल चित्रपट निर्माते कितीही असले तरी ते स्वत:च्या हाताने बॉलीवूड इंडस्ट्रीला उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत, असे म्हणत राजकुमार रावच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द फस्ट केस चित्रपटाच्या कमाईबद्दल खिल्ली उडवली आहे. राजकुमार रावचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘हिट – द फर्स्ट केस’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 1.50 कोटींची कमाई केल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत केआरकेने राजकुमार रावच्या हिट चित्रपटाबद्दल दिलेल्या या वक्तव्यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. केआरकेच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी दर्शवताना त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. यावर एका ट्विटर युजरने ट्विट केले आहे की “छान राशिद खान, तुम्हाला माहित नाही की कदाचित राजकुमार राव खूप दमदार अभिनेता आहे.” असे म्हणले आहे तर दुसर्या एकाने “तुम्ही कृपया चित्रपटांचे पुनरावलोकन करणे थांबवा असे म्हणत केआरकेला चांगलाच दम दिला आहे.
- हेही वाचा –
- ललित मोदींसोबतच्या नात्याची पुष्टी केल्यानंतर, सुष्मिता सेनने घेतला मोठा निर्णय, भाऊ राजीव सेनला बसेल धक्का
- ‘तु सुखात रहा…’ सुष्मिता सेनच्या नव्या प्रेमप्रकरणावर एक्स बॉयफ्रेंडने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
- सुष्मिता सेनला डेट करण्यावर ललित मोदींचा मुलगा रुचिरचं वक्तव्य; म्हणाला, ‘मी अजिबात…’










