Friday, November 14, 2025
Home कॅलेंडर ऑन-स्क्रीन धमाल करणाऱ्या अभिनेत्रीचा बेंगलोरला जाताना झाला होता अपघात, अखेरची तेरा वर्ष काढली व्हिलचेअरवर

ऑन-स्क्रीन धमाल करणाऱ्या अभिनेत्रीचा बेंगलोरला जाताना झाला होता अपघात, अखेरची तेरा वर्ष काढली व्हिलचेअरवर

रंजना देशमुख या 1970 आणि 80 च्या दशकातील एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री होत्या. ऑन-स्क्रीन त्या फक्त रंजना म्हणूनच प्रसिद्ध होत्या.

रंजना या प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या. त्यांची मावशी संध्या यांचे लग्न व्ही. शांतारामशी झाले होते, ज्यांनी रंजनाला रुपेरी पडद्याची ओळख करून दिली. सन 1975 मध्ये त्यांनी ‘चंदनाची चोळी, अंग अंग जाळी’ या चित्रपटातून पदार्पण केले.

त्यानंतर व्ही शांताराम यांच्या पुढच्या ‘झुंज’ या चित्रपटात रंजना यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. त्यांनी ‘अरे संसार संसार’ (1980), ‘गुप चूप गुप चूप’ (1983) या चित्रपटांसाठी दोनदा राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा  पुरस्कार जिंकला होता.

सन १९८७ मध्ये रंजना ‘झुंजार’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बेंगलोरला जात होत्या. जाताना त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. या अपघातात रंजना वाचल्या, परंतु त्यांच्या दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली आणि त्यांचा डावा हातही निकामी झाला.

अपघातावेळी, मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार देखील त्यांच्यासोबत गाडीत होते. पण त्यांना काही झाले नाही. अपघातावेळी रंजना यांचे वय केवळ ३२ वर्षे होते. या अपघातानंतर त्या अनेक वर्षं व्हीलचेअरवरच होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची १३ वर्षं ही व्हीलचेअरवरच काढली.

यानंतर मध्य मुंबईतील परळ येथे रंजना यांचे हृदय हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 2000 साली वयाच्या 45 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या काळात आई वत्सला देशमुख आणि मावशी संध्या त्यांच्या सोबत होत्या.

त्यांच्या अन्य प्रमुख चित्रपटांमध्ये ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबाईचा फौजदार’, ‘बिन कामाचा’, ‘नवरा’, ‘खिचडी’, ‘चणी’, ‘जखमी वाघिन’, ‘भुजंग’ आणि ‘एक डाव भूताचा’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!

हे देखील वाचा