सुशांतने अनेक वर्ष मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या प्रभावी अभिनयाचा ठसा मनोरंजनसृष्टीत उमटवला. खूपच कमी काळात त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले. अनेक दर्जेदार सिनेमे देणारा सुशांत एक उत्तम डान्सर देखील होता. नेहमी हसतमुख असणारा सुशांत अचानक सर्वाना चटका लावून आणि अनेक प्रश्न निर्माण करून या जगाला अलविदा करत निघून गेला. आज सुशांतचा वाढदिवस. सुशांतच्या निधनाने त्याच्या कुटुंबासोबतच, फॅन्स आणि मनोरंजनविश्वावर दु:खाचा डोंगरच कोसळला. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे फॅन्स ‘सुशांत डे’ साजरा करत आहे.
आज जर सुशांत जिवंत असता तर त्याने त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला असता. सुशांतचे निधन झाल्यापासूनच त्याचे फॅन्स त्याचे विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्याची आठवण काढत असतात. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशांतच्या तीन वर्ष जुना एक व्हिडिओ खूप वायरल होत आहे.
हा व्हिडिओ २०१८ मध्ये सुशांतच्या राहत्या घरात चित्रित करण्यात आला होता. ह्या व्हिडिओमध्ये सुशांत आणि त्याचे घर दाखवले जात आहे. शिवाय सुशांत त्याच्या घरात कसा राहतो, घरात किती खोल्या आहेत, काय काय समान आहे, त्याचे फोटो, त्याची लायब्ररी, आदी दाखवताना दिसत आहे.
आमचा टेलीग्राम चॅनेल येथे क्लिक करुन जॉईन करा.
सोबतच सुशांतच्या दृष्टीने घर आणि घराचा अर्थ देखील तो सांगत आहे. या व्हिडिओप्रमाणे सुशांतला जुन्या वस्तूंचा खूप शौक आहे. त्याने त्याच्या घरात अनेक जुन्या वस्तुंना जतन करुन ठेवले आहे. सुशांतला वाचनाची आवड असल्याने त्याच्याकडे अनेक लेखकांची भरपूर पुस्तके देखील आहेत. त्याच्या घराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याच्याकडे असणारा टेलिस्कोप. त्याला अवकाशाबद्दल खूप कुतूहल होते. म्हणून त्याने त्याच्या कडे एक भला मोठा टेलिस्कोप घेतला होता. तो नेहमी त्याच्यातून आकाश बघायचा. हा जून त्याचा छंद बनला होता. फावल्या वेळात तो गिटार देखील वाजवायचा.
अतिशय खुल्या मनाने, मनमुराद जीवन जगणारा सुशांत १४ जून २०२० ला या जगाला सोडून निघून गेला, कधीही परत न येण्यासाठी. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उभे राहिले, त्याच्या मृत्यचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय, एनसिबी आदी डिपार्टमेंट प्रयत्नशील आहेत. मात्र सहा महिने उलटूनही सुशांतने आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरित आहे. सोशल मीडियावर त्याचे फॅन्स त्याला न्याय मिळवून देण्यासाठी खूप मागणी करत आहे. पण अजूनही कोणीच ठोस आणि समाधानकारक उत्तर देत नाहीये.