एकता कपूर हि एक लोकप्रिय निर्मितीकार आहे. तिने आता पर्यत अनेक उत्तम मालिका काढल्या तसेच तिने जे काही काम केले आहे ते नेहमीच प्रेक्षकांच्या पंसतीस उतरले आहे. आणि आता सध्या एकता कपूरची नागिन मालिका गाजत आहे पण एक एकता कपूरची अशी मालिका आहे जी आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान करुन आहे. आणि त्यातील गाणे त्या मालिकेचे शिर्षक गीत आणि यातील कलाकरांना लोक आजही विसरु शकले नाहीत. तर प्रेरणाची भूमिका साकारून श्वेता तिवारी घराघरात पोहोचली, तर अनुराग बसूची भूमिका साकारणारा सेझान खानही खूप लोकप्रिय होता. मिस्टर बजाजची भूमिका साकारणारे रोनित रॉय, कोमोलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी ढोलकिया आणि इतर कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली. पण तुम्हाला या सुपरहिट मालिकेतील आणखी एक खलनायिका, अपर्णा आठवते का? तीच अपर्णा जी अनुराग बसूची तिसरी पत्नी बनली.
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील पात्र अनेक लोकांना भावले आणि त्यातील कथाचे प्रेक्षकांवर खुप प्रभाव पडला होता. त्यामुळे सुरुवातीला बहुतेक प्रेक्षकांना कोमोलिकाचा तिरस्कार वाटत असला तरी, अपर्णा अनुरागला (anurag)ठार मारून एक अधिक शक्तिशाली खलनायिका म्हणून समोर आली. हा एपिसोड टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड ठरला, ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. मात्र तो नंतर तो वाचतो.
गीतांजली टिकेकरने तिच्या करिअरची सुरुवात 2002 मध्ये ‘क्या हदसा क्या हकीकत’ या मालिकेद्वारे केली, पण ‘कसौटी जिंदगी की’ मधील खलनायिकेच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मात्र ही भुमिका साकारुन ती प्रेक्षकांच्या ओळखीची झाली. त्यानंतर तिने काही मालिकामध्ये काम केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सीझन 2 सह धमाकेदार पुनरागमन; रणदीप हुड्डाची सिरीज आता जियो हॉटस्टारवर रंगणार









