Friday, May 15, 2026
Home मराठी अवघा महाराष्ट्र थिरकणार तर्राटवर, विशाल ददलानीच्या आवाजातील ‘तुंबाडची मंजुळा’मधील भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अवघा महाराष्ट्र थिरकणार तर्राटवर, विशाल ददलानीच्या आवाजातील ‘तुंबाडची मंजुळा’मधील भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अवघ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर थिरकवण्यासाठी झी स्टुडिओजच्या ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटातील ‘तर्राट’ हे भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्याच्या जोशपूर्ण बीट्स, धमाल वातावरण आणि उत्साहाने भरलेल्या सादरीकरणामुळे हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

या गाण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे या गाण्याला बॉलिवूडला ‘बलम पिचकारी’, ‘झुमे जो पठाण’, ‘ मल्हारी ’ अशी अनेक लोकप्रिय गाणी गाणारे गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांचा दमदार आवाज लाभला आहे. विशाल ददलानी यांच्या एनर्जेटिक गायकीने या गाण्याला एक वेगळीच रंगत भरली आहे.

या गाण्याविषयी विशाल ददलानी म्हणतात, “ ‘तर्राट’ गाणं पहिल्यांदा ऐकल्यावरच मला त्याची तुफान एनर्जी जाणवली. या गाण्यात एक मोकळेपणा, भन्नाट बीट्स आणि सेलिब्रेशनची मजा आहे. हे गाणं गाताना मी स्वतः खूप एन्जॉय केलं आणि मला खात्री आहे की, प्रेक्षकही या गाण्यावर तितक्याच उत्साहात नाचतील.”

या गाण्याबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की , ”
तर्राट साठी जेव्हा गायकांच्या नावाचा विचार सुरू होता तेव्हा सर्वप्रथम विशाल ददलानी हेच नाव समोर आले. हिंदी संगीतामध्ये त्यांनी केलेले प्रयोग, त्यांनी गायलेली वेगळ्या ढंगाची सर्वच गाणी ही लोकप्रिय झालेली आहेत. या गाण्यासाठी लागणारी योग्य एनर्जी त्यांच्याकडे आहे. त्यांच्या आवाजामुळे या चित्रपटाच्या संगीताचा स्तर अजूनच वर गेला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने वेगवेगळे संगीत प्रयोग करत श्रोत्यांना एक परिपूर्ण अल्बम देण्याचा आमचा विचार आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या राहुल देशपांडे, आर्या आंबेकर, अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांना रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला तेच प्रेम या गाण्यालासुद्धा मिळेल असा विश्वास आहे.”

या गाण्यात जितेंद्र जोशी (joshi)आणि ओम भुतकर यांचा भन्नाट डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळत असून त्यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचाही हटके अंदाज पाहायला मिळत आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे गाण्यात एक वेगळीच मजा आणि रंगत आली आहे.

सध्या सगळीकडे लग्नसराई, हळदी आणि सेलिब्रेशनचा माहोल सुरू आहे. अशा वातावरणात रंग भरायला आणि प्रत्येकाला मनसोक्त नाचायला भाग पाडण्यासाठी ‘तर्राट’ हे गाणं अगदी परफेक्ट ठरणार आहे. गाव असो की, शहर, प्रत्येक भागातील प्रेक्षक हे गाणं तितक्याच उत्साहात एन्जॉय करू शकतील, अशी धमाल एनर्जी या गाण्यात पाहायला मिळते.

असीम कुलकर्णी, प्रतीक टेळवणे आणि तेजस जोशी यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे तर गीतकार विक्रम एडके यांच्या शब्दांनी गाण्याला खास ढंग दिला आहे.

५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटात प्रेक्षकांना कलाकारांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे. जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट विविध कोरगांवकर यांनी दिग्दर्शित केला असून कथा आणि लेखन ऋषिकेश तुरई यांचे आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सीझन 2 सह धमाकेदार पुनरागमन; रणदीप हुड्डाची सिरीज आता जियो हॉटस्टारवर रंगणार

हे देखील वाचा