Tuesday, May 12, 2026
Home बॉलीवूड अमिताभ बच्चन यांना जेव्हा रात्री झोप येत नाही, तेव्हा ते वापरतात खास हा उपाय

अमिताभ बच्चन यांना जेव्हा रात्री झोप येत नाही, तेव्हा ते वापरतात खास हा उपाय

अमिताभ बच्चन हे एक लोकप्रिय बॉलिवूड सुपरस्टार आहेत. त्याने आतापर्यंत त्याच्या दमदार भूमिकेमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अमिताभ बच्चन हे आता 83 वर्षांचे आहेत. त्याचे जरी वय झाले असले तरी ते आजही तिथकेच उत्सहाने काम करतात. त्याचा ‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ रिॲलिटी शोचे चित्रीकरणही चालुच असते. तसेच कार्यक्रमात व सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. तर अलीकडेच, त्यांनी त्यांच्या नवीन ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे की, ते संगीत थेरपीच्या मदतीने झोपेची कमतरता आणि कामाचा ताण सांभाळतात.

अमिताभ (amitabh)बच्चन  यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे, “आजकाल, मी सकाळी झोपण्याची कोणतीही प्रक्रिया सुरू करत नाही… का? कारण झोपेपेक्षा काम अधिक महत्त्वाचे झाले आहे. पण डॉक्टर म्हणतात की हे बरोबर नाही. शरीराला किमान सात तासांच्या झोपेची गरज असते. कारण, जेव्हा शरीर झोपते, तेव्हा त्याची वाढ होते आणि  अशा परिस्थितीत मी काय करावे? काम करत असताना, मी माझ्या ब्लॉगवर लक्ष केंद्रित करतो. पण मध्यरात्रीच्या शांततेत, स्लाईड गिटार आणि सतारवर वाजवलेले संगीत, जे सर्वात भावपूर्ण शास्त्रीय संगीत ऐकतो. हा एक अनोखा दिलासा देतो.

बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केले आहे की, अस्वस्थ रात्रींमध्ये संगीत त्यांना शांत करते आणि झोपायला मदत करते. तर या पध्दतीने ते झोपण्याचा प्रयत्न करतात. अमिताभ बच्चन हे एक उत्तम अन् लोकप्रिय कलाकार आहेतच मात्र ते एक उत्तम व्यक्ती आणि त्याची कामाविषयीची आतुरता याबाबत नव पिढी साठी एक उत्तम उदाहरण आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा



8.5 IMDb रेटिंग असलेल्या या मालिकेने भारतीय प्रेक्षकांना लावलं होत वेड, मालिका लागताच सगळी कामे थांबायची

हे देखील वाचा