सध्या सोशल मिडीयावर काही फोटोज व्हायरल होत आहे. ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आता मराठी बायोपिक बनवला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जीवनप्रवास लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. या व्हायरल होत असणार्या फोटोत अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील बघायला मिळत आहे.
एका चित्रपटाच्या सेटवरील फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. या फोटोत अभिनेत्री तेजस्विनी पंडित एका अभिनेत्यासोबत चित्रपटाच्या सेटवर उभी असलेली दिसत आहे. या फोटोतल्या अभिनेत्याचा लूक हुबेहूब राज ठाकरे यांच्यासारखा आहे. फोटोत या अभिनेत्याची फक्त मागची बाजू बघायला मिळत आहे. या फोटोत तेजस्विनी दिसत असल्याने ती चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे का ? किंवा ती निर्माती आहे का ? अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र यामुळे राज ठाकरे यांचे चाहते अत्यंत खुश झाले आहेत.
राज ठाकरे हे व्यक्तिमत्त्व साधेसुधे नसून त्यात अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन कोणता अभिनेता हि भुमिका साकारण्याचं सामर्थ्य बाळगतो हे बघण्यासारखे असेल. याबाबत सोशल मिडीयावर जोरदार चर्चा देखील रंगल्या आहेत. नक्की असाच एखादा चित्रपट बनणार आहे का कि नाही हे अजून निश्चित नाही. मात्र येत्या काळात काय होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यात उभी होती शर्वरी बघ, अभिनेत्रीने केला एक मजेशीर खुलासा