अमिताभ बच्चन हे एक लोकप्रिय कलाकार आहेत. त्याचे आता वय जरी जास्त असेले तरी ते आज ही तितक्याच जोराने प्रेत्यक गोष्टीत सहभागी असतात. आणि आता मिळाल्या माहीती नुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशा जोरदार चर्चा आहेत. तर अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र या बातमीमुळे चाहते आता चिंतेत आहेत. तर या दरम्यान अमिताभ बच्चन हेसोशल मीडियावर सक्रिय असून, दररोज पोस्ट करून चाहत्यांना आश्वासन देत आहेत की त्यांची प्रकृती ठीक आहे. तर या वेळी एक अशी पोस्ट केली की त्यामुळे जास्त खळबळ उडाली.
अमिताभ बच्चन (bachchan)यांनी 20 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक पोस्ट शेअर केली, ज्यावर लिहिले होते, “पिलोरी- बरुंबा.” ही पोस्ट पाहिल्यानंतर वापरकर्त्यांनी त्याचे वेगवेगळे अर्थ लावायला सुरुवात केली आहे. वास्तविक, हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्गाला बोलीभाषेत पायलोरी किंवा बरुंबा असेही म्हटले जाते. हा एक प्रकारचा जिवाणू संसर्ग आहे ज्यामुळे पोटाच्या वरच्या भागात वेदना आणि अपचन होते. तर या मुळे चाहते आता चिंतेत आहेत. तसेच त्यांना सर्वानी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच अमिताभ बच्चन याच्यासाठी अनेक चाहते चिंतेत आहेत. तसेच अनेकांनी खुप सारे प्रश्न विचारले आहेत. आणि आराम करा असे कमेंट मध्ये म्हणले आहे. तर अलीकडेच, विकी लालवानीने सोशल मीडियावर दावा केला की अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने सांगितले की, या बातमीची खात्री करण्यासाठी त्याने स्वतः रुग्णालयाला भेट दिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बालिका वधूची गहना आता यशस्वी उद्योजिका; तुरटीच्या व्यवसायातून कमावतेय लाखो-कोटी रुपये










