Monday, May 18, 2026
Home वेबसिरीज प्राईम व्हिडिओवरील दमदार सिरीज, 8.2 IMDb रेटिंगसह सस्पेन्सने भरलेली आहे हि कथा

प्राईम व्हिडिओवरील दमदार सिरीज, 8.2 IMDb रेटिंगसह सस्पेन्सने भरलेली आहे हि कथा

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अशीच एक सिरीज म्हणजे मिर्झापूर, या सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.  तर अशीच एक मालिका तुम्ही शोधत असाल तर ज्यामध्ये कथाही ड्रामा, क्राईम, सस्पेन्स भरलेली असेल ती म्हणजे अपहरण ही सीरीज आहे.

अपहरण ही सिरीज  लोकप्रियत्याच्या बाबतीत ‘भौकाल’लाही टक्कर देते, याचा पहिला सीझन 2018 मध्ये आणि दुसरा 2022 मध्ये प्रदर्शित झाला. हि एक हिंदी भाषिक सिरीज आहे. आणि ती पाहण्यासाठी प्राईम व्हिडिओ वर उपलब्ध आहे. तर ही मालिका सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी दिग्दर्शित आणि सह-निर्मित केली आहे. तर या मालिकेची कथा जी अपहरण, सस्पेन्स, रहस्यमय मृत्यू या भोवती फिरते.

सीझन 1 मध्ये, अरुणोदय सिंग (singh)यांनी उत्तराखंड पोलिसातील वरिष्ठ निरीक्षक रुद्र श्रीवास्तव यांची भूमिका साकारली आहे. सीझन 2 मध्ये रुद्र आपले कर्तव्य आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन साधण्यासाठी संघर्ष करताना दिसतो. तर हे दोन्ही सीजन उत्तम गाजले आहेत आणि या दोन्ही सीरिजला IMDb वर 8.2 रेटिंग आहे. जर तुम्हाला अश्या स्वरुपांची मालिका पाहण्यासाठि आवडत असतील तर अपहरण मालिका नक्की पहा.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा

बालिका वधूची गहना आता यशस्वी उद्योजिका; तुरटीच्या व्यवसायातून कमावतेय लाखो-कोटी रुपये

हे देखील वाचा