Friday, December 1, 2023

पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राच्या आयुष्यावर बायोपिक; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्रासाठी 2021 हे वर्ष खूपच वाईट ठरले. ‘अ‍ॅडल्ट फिल्म स्कँडल’ प्रकरणात तुरुंगात गेलेला राज कुंद्रा बराच चर्चेत राहिला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा नेहमीच मीडियासमोर आपला चेहरा लपवत असे. कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा विमानतळाचा लूक, राज कुंद्राने नेहमीच आपल्या विचित्र मास्कने आपला चेहरा लपवून ठेवला आहे. शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता लवकरच राज कुंद्राच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे.

या चित्रपटाचे नाव ‘UT69’ आहे. हा चित्रपट राज कुंद्राच्या (Raj Kundra Movies) जीवनातील 63 दिवसांवर आधारित आहे. ज्यामध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याने तुरुंगात काढलेले दिवस यांचा समावेश आहे. राज कुंद्राने स्वतः या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केली आहे. त्याचबरोबर तो या चित्रपटात मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे.

राज कुंद्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत या चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली आहे. हा चित्रपट ३ नोव्हेबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल राज कुंद्राने म्हटले आहे की, “हा चित्रपट माझ्या आयुष्यातील एक कठीण काळावर आधारित आहे. या काळात मी खूप काही अनुभवले आहे. हा चित्रपट माझ्या आयुष्यातील सत्य सांगत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@onlyrajkundra)

 राजने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्य फराह खान देखील दिसत आहे. त्यामध्ये तिला हा चित्रपट तुम्ही बनवला आहे का? असा प्रश्न वारंवार विचारल्यामुळे ती चिडलेली दिसत आहे. तसेच ती ओरडून याने बनवला आहे असे सांगताना दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन राज कुंद्राने स्वतः केले आहे. त्यामुळे हा चित्रपट राज कुंद्राच्या बाजूचे चित्रण करेल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (A biopic on the life of Raj Kundra caught up in the pornography case)

आधिक वाचा-
वाढदिवसाचे औचित्य साधून रकुलप्रीत सिंगने केला ‘या’ निर्मात्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा
डिमांड तर बघा! रकुल प्रीत सिंगला करायचे होते ‘या’ रोमँटिक सिनेमात काम, शाहरुख खानला मानते आदर्श

हे देखील वाचा