[rank_math_breadcrumb]

‘मुथु एंगिरा काट्टान’ मध्ये उलगडणार मोठं रहस्य, विजय सेतुपतीची नवी मिस्ट्री सिरीज चर्चेत

विजय हा साऊथ चित्रपट मधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये काम केलेच आहे, तसेच बॉलीवूड मध्येही उत्तम काम केले आहे. तर तो सध्या आता त्याच्या वेब सिरीज मध्ये चर्चेत आला आहे. तर आता सेतुपती यांची नवीन वेब सीरिज “‘मुथु एंगिरा काट्टान” ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. निर्मात्यांनी आता ट्रेलर रिलीज केला आहे.

“‘मुथु एंगिरा काट्टान” ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे आणि 27 मार्च 2026 रोजी स्ट्रीमिंग सुरू होईल. सुरुवातीला या शोची घोषणा जिओहॉटस्टार साउथ अनबाउंड कार्यक्रमात करण्यात आली होती. रिलीजची तारीख आणि ट्रेलरबाबत अधिकृत अपडेट टीमने प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया हँडलद्वारे शेअर केले होते. अपडेट देताना, टीमने लिहिले, “कटान म्हणून ओळखले जाणारे हे मुथु कोण आहे?

विजय (vijay)सेतुपती पुढे ‘स्लमडॉग मिलियनेअर – 33 टेम्पल रोड’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या अ‍ॅक्शन चित्रपटात संयुक्ता आणि तब्बू देखील मुख्य भूमिकेत आहेत. या अभिनेत्याने अलीकडेच ‘पॉकेट नॉव्हेल’ नावाच्या एका प्रोजेक्टची घोषणा केली. थियागराजन कुमारराजा दिग्दर्शित हा चित्रपट ‘सुपर डिलक्स’ नंतर दिग्दर्शक आणि अभिनेत्याचा दुसरा सहयोग आहे. मालविका मोहनन आणि राज बी. शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, मेगास्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ चित्रपटात विजय सेतुपतीचा कॅमिओ आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

पाच भारतीय चित्रपटांनी ऑस्करमध्ये प्रवेश केला, त्यापैकी एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचला होता इतिहास आणि तो अजूनही आहे विस्मरणीय