Thursday, September 28, 2023

‘सुभेदार’ चित्रपट पाहतच समीर वानखेडे यांनी केली पोस्ट शेअर; म्हणाले, ‘प्रत्येक भारतीयांचे…’

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal lanjekar) यांचा सुभेदार हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल चांगलेच क्रेझ होती.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील खूप चांगला धुमाकूळ घातला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडिया वरती या चित्रपटाची पोस्ट करून सुभेदार चित्रपटाचे कौतुक केले आहे. अशातच आता समीर वानखेडे यांनी देखील एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी सुभेदार चित्रपटाबद्दल लिहिले आहे आणि त्यांच्या या पोहोचणे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

समीर वानखेडे यांनी काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेले दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ हे थेटरमधील दिसत आहेत. समीर वानखेडे यांनी थेटर मधील प्रेक्षकांसोबत संवाद साधला आहे.

यावेळी हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “एक महान योद्धा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर आणि याही असलेले सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित एक सुंदर चित्रपट पाहण्याची संधी मिळाली प्रत्येक भारतीयाचे ते खरे हिरो आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे त्यांचे भव्य पेंटिंग मिळण्याचा मान ही मिळाला.” अशाप्रकारे त्यांनी पोस्ट केलेली आहे त्यांची ही पोस्ट सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सुभेदार या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेते चिन्मय मांडलेकर या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातील कलाकारांनी सगळ्यांचीच म्हणी वेधून घेतलेली आहेत या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळी, मृण्मयी देशपांडे या कलाकारांनी देखील अतिशय उत्तम काम केले आहे. (Sameer Wankhede shared the post while watching the movie ‘Subhedar’)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘तू तर मराठीतला शाहरुख खान’, पाहा चाहत्याच्या कमेंटवर काय म्हणाला गष्मीर महाजनी
…म्हणून शाहरुख खान करतो वयाने अर्ध्या असणाऱ्या अभिनेत्रींसोबत काम, अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
‘जवान’चे VFX बनवणाऱ्या ‘या’ कंपनीला मिळाला सन्मान, शाहरुखचे अजय देवगणसोबत नाते पुन्हा समोर

हे देखील वाचा