खुल्लम खुल्ला रोमांस.! आदित्य आणि श्वेताच्या रोमॅंटिक व्हिडिओची सोशलवर खमंग चर्चा, आवर्जून पाहिला जातोय व्हिडिओ


बॉलिवूडचे ज्येष्ठ गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण. ३ नोव्हेंबरला आदित्य नारायणने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची माहिती दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या लग्नामुळे तो सतत चर्चेत येत आहे. सलग १० वर्षे रिलेशनमध्ये राहणाऱ्या या क्युट कपल्सनी डिसेंबर महिन्यात सर्वांच्या चर्चेला पूर्णविराम देत एकमेकांसोबत लग्न केले.

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल हे लग्नानंतर सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह दिसत होते. आपल्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोला सोशल मीडियावर अपलोड करत नेहमी चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनत असतात.  त्यांच्या या केमिस्ट्रीमुळे चाहते हे त्यांना अधिकच पसंत करतात.

नुकतेच आदित्य नारायणने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला होता आहे, ज्यात तो श्वेता सोबत अधिकच रोमॅंटिक बनत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या हनिमूनचा आहे. आपल्या लग्नानंतर ते दोघे हनिमून साजरा करण्यासाठी काश्मीरला गेले होते.

यात श्वेता आदित्यचे कान चावत आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. एकमेकांच्या सानिध्यात ते खूपच खुश दिसत आहेत.

आदित्यने या अगोदरही पत्नी श्वेताचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होता. ज्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने श्वेताला ‘वॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा देताना रोमॅंटिक अंदाजात मजकूर लिहिला होता. त्या फोटोलाही चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळाली होती.

आदित्य आणि श्वेता यांची ओळख शापित चित्रपटाचा सेटवर झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. आदित्य हा एक गायक आणि अभिनेता आहे. सोबतच तो इंडियन आयडल या रियालिटी शोचे सूत्रसंचालन देखील करतो.याउलट श्वेताने आपल्या करीयरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली आहे.

श्वेता २००० मध्ये ‘बाबुल की दुल्हनिया’ या मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर सन २००१ च्या शगुन आणि २००४ च्या ‘देखा मगर प्यार से’ मध्ये देखील तिने अभिनय केला होता. श्वेता हिने दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून फिल्मी जगात पाऊल ठेवले. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला ‘शापित’ या चित्रपटाद्वारे श्वेता आणि आदित्य हे एकमेकांसोबत दिसले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.