अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) चित्रपटांची गाडी सध्या सगळीकडे सुसाट पळताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाने दमदार कमाई केली होती. या चित्रपटातील आलिया भट्टच्या डॅशिंग भूमिकेने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले होते. आता आलियाच्या ‘आरआरआर’ या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात संपुर्ण टीम व्यस्त असताना, आता यामध्ये अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) एंट्री झाली आहे. सोशल मीडियावर सध्या ‘आरआरआर’च्या टीमसोबत डान्स करतानाचा आमीर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S.S Rajamouli) यांचा ‘आरआरआर’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr.NTR), राम चरण (Ram Charan), आलिया भट्ट (Alia Bhatt), आणि अजय देवगण (Ajay Devgan) अशा दिग्गज कलाकारांचा भरणा असलेला हा चित्रपट चांगलाच गाजणार आहे.
एसएस राजामौली यांनी याआधी ‘बाहुबली’ या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्यांचा हा चित्रपटही चांगलाच लोकप्रिय ठरणार आहे. सध्या या चित्रपटाची संपुर्ण टीम प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये दाखल झाली होती यावेळी दिग्गज अभिनेता आमीर खाननेही हजेरी लावत आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभाग घेतला इतकेच नव्हेतर आमीर खानने ‘आरआरआर’ च्या टीमसोबत डान्सही केला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये आमीर खानला ‘आरआरआर’च्या टीमने त्यांच्या ‘नाटो नाटो’ या गाण्यामधील स्टेपवर डान्स करण्याची विनंती केली. अभिनेता आमीर खाननेही या गाण्यावर थिरकण्यास सुरूवात केली, ज्यामुळे उपस्थितांना मोठा आनंद झाल्याचे दिसत आहे. यावेळी आमीर खानने या गाण्यातील डान्स शिकण्याचाही सराव केला. या दिग्गज कलाकारांच्या जबरदस्त डान्सने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना मात्र आकाश ठेंगणे झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याआधी ‘आरआरआर’ चित्रपटाची टीम गुजरातमध्येही प्रमोशनला गेली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –