‘समाजात फूट पाडणारे चित्रपट टाळायला हवे’, वाचा काश्मिर फाईल्स चित्रपटाबाबत काय बोलले शरद पवार

सध्या देशभरात विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला सध्या देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची कथा १९९० मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या अन्याय अत्याचारावर आधारित आहे. या घटनेचा त्या काळातील राजकीय वातावरणही मोठ्या प्रमाणावर ढवळून काढले होते त्यामुळे द काश्मिर फाइल्स चित्रपटानेही सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ माजवली आहे. काही राज्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर करमुक्त केले आहेत, इतकेच नव्हेतर काही दिवसांपुर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चित्रपटावर सडकून टिका केली आहे. नेमके काय म्हणाले आहेत शरद पवार चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाबद्दल बोलताना शदर पवार यांनी ‘समाजात फूट पाडणारे चित्रपट आणि लेखन यांपासून आपल्याला दुर राहायला हवे’ असे परखड मत व्यक्त केले आहे. पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “१९९० मध्ये काश्मिरी पंडितांवरर झालेल्या अन्याय अत्याचारासाठी संपूर्णपणे कॉंग्रेस पक्ष जबाबदार आहे असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. या सगळ्या घटनेचे खापर कॉंग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून देण्यात आला आहे. मात्र त्या काळात देशात कॉंग्रेसची सत्ताच नव्हती, त्यामुळे अशा प्रकारचा आरोप करणे चुकीचे आहे. कारण ज्यावेळी काश्मिरी पंडितांचे पलायन झाले तेव्हा केंद्रात विश्वनाथ प्रतापसिंग यांचे सरकार होते त्यामुळे भाजपा करत असलेला आरोप साफ चुकीचा आहे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

याबद्दल पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, “ज्यावेळी काश्मिरी पंडितांचे पलायन झाले, तेव्हा केंद्रातील वी.पी. सिंग सरकारला भाजपच्याच काही सदस्यांचे समर्थन होते.यावेळी भाजपच्याच सहकार्याने मुफ्ती मोहमद सईद केंद्रात गृहमंत्री बनले होते जे आता त्यांच्याबद्दल कळवळा दाखवत आहेत. त्याचप्रमाणे त्यावेळी जम्मू काश्मिरचे राज्यपाल असलेल्या जगमोहन यांचाही कॉंग्रेस पक्षाशी काही संंबंध नव्हता,” असे ही यावेळी ते म्हणाले आहेत. दरम्यान सध्या काश्मिर फाइल्स चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने कमाईचे अनेक नवनवे रेकॉर्ड तयार केले आहेत. चित्रपटात अनुपम खेर, पल्लवी जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post