Friday, January 27, 2023

वडिलांवरील आर्थिक संकटं आठवून रडला आमिर खान; म्हणाला, ‘अब्बाजानला पाहून खूपच…’

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. आमिरला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. तसेच, त्याने त्याच्या कुटुंबाच्या कठीण काळाविषयी भाष्य केले. यावेळी वडील नासिर हुसैन यांच्या संघर्षाबद्दल बोलताना आमिर खान रडला.

काय म्हणाला आमिर खान?
आमिर खान (Aamir Khan) याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला, जेव्हा त्याचे वय फक्त 10 वर्षे होते. तसेच, त्याने त्याच्या कुटुंबाच्या परिस्थितीबद्दलही वक्तव्य केले. त्याने सांगितले की, त्याच्या वडिलांनी एका सिनेमासाठी व्याजाने कर्ज घेतले होते. मात्र, सिनेमा जवळपास 8 वर्षे उलटूनही बनू शकला नाही. हे सांगताना तो भावूक झाला आणि त्याने मध्येच मुलाखतही थांबवली. मात्र, पुन्हा परतल्यावर तो म्हणाला की, त्यावेळी त्या वडिलांना होणारा त्रास बघून सर्वांनाच चिंता वाटायची. कारण, ते खूपच सामान्य व्यक्ती होते. कदाचित त्यांना इतके कर्ज न घेण्याची समज नव्हती.

आमिरच्या वडिलांना यायचे फोन
आमिरने सांगितले की, सिनेमाचे तिकीट ब्लॅकमध्ये विकल्याने निर्मात्यांनाही नेहमीच त्यांची देय रक्कम मिळत नाही. तो म्हणाला की, “वडिलांचे काही सिनेमे चालले, पण त्याच्याकडे कधीच पैसा नव्हता. त्यांना संकटात पाहून त्रास व्हायचा. कारण, ज्यांच्याकडून पैसे घेतले होते, त्या लोकांचे फोन यायचे. त्यांचे फोनवर भांडण सुरू व्हायचे की, मी काय करू, माझ्याकडे पैसे नाहीत. माझे सिनेमे अडकले आहेत. माझ्या अभिनेत्यांना सांगा की, मला तारखा द्या. मी काय करू?”

आमिर खाननेही सहन केलीय आर्थिक तंगी
पुढे बोलताना आमिरने सांगितले की, त्याचे वडील एका वेळेनंतर गोष्टी ठीक झाल्यावर सर्वांचे पैसे परत करायचे. एकदा त्यांनी महेश भट्ट यांना त्यांच्या एका सिनेमासाठी पैसे परत केले होते. ते पैसे भेटल्यानंतर तेदेखील हैराण झाले होते. कारण, त्यांनी यासाठी सर्व अपेक्षा सोडल्या होत्या. पुढे बोलताना आमिरने असेही सांगितले की, आर्थिक तंगी असूनही त्याच्या शाळेची फी नेहमी भरली जात होती. इतकेच नाही, तर त्याची आई त्याच्यासाठी लांब पँट विकत घ्यायची आणि खालून ती पँट मुडपायची, जेणेकरून त्याला ती पँट अधिक काळ वापरता येईल.

बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा सिनेमा फ्लॉप
अभिनेता आमिर खान शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात झळकला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खास कमाई केली नव्हती. मात्र, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यावर या सिनेमाला पसंती मिळाली होती. आता आमिर इतर प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. मात्र, त्याने अद्याप याची घोषणा केली नाहीये. (actor aamir khan broke down recall when his father took loans for films couldn’t be paid back)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
कलाविश्व हादरले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये आगीचे तांडव, जीव वाचवण्यासाठी मुलीने मारली उडी
असं काय झालं की, एक्स पतीशी संबंधित निर्णयाची आठवण काढत मलायका रडली ढसाढसा? पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा