×

आमिर खानमधील लपलेले टॅलेंट आले समोर, चाहते म्हणाले ‘त्याला उगाच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात का?’

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान प्रत्येक गोष्टीत एक्स्पर्ट आहे. तो आपल्या कामासोबतच कुटुंबालाही तेवढाच वेळ देतो. आमिर खान त्याची मुलगी इरा खानच्या खूप जवळ आहे. इरा सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते आणि अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चाहत्यांना फोटो किंवा व्हिडीओद्वारे सांगत असते. इरा अनेकदा तिचे वडील आमिर खानसोबतचे फोटो शेअर करत असते.

अलीकडेच इरा खानने तिच्या वडिलांसोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. इराने लिहिले की, “माझा मेकअप कोणी केला आहे याचा अंदाज लावा… जेव्हा तुमचे बाबा तुमच्याकडे येतात आणि ते तुमच्यापेक्षा चांगला मेकअप करू शकतात असा दावा करतात तेव्हा ते मनोरंजक असते… आणि तो बरोबर ठरला. कोणाला यूट्यूब ट्यूटोरियलची आवश्यकता आहे?”

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आमिर प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे हे फोटो साक्ष देतात. या तीन फोटोंमध्ये आमिर हसत हसत आपल्या मुलीसोबत पोज देत आहे. आमिर आणि इरा अनेकदा वडील-मुलीच्या नात्याशी संबंधित काहीतरी शेअर करतात. इरा ही आमिरची पहिली पत्नी रीनाची मुलगी आहे, तिचे आमिरसोबत खूप मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

त्याच्या कामांबद्दल बोलायचे झाल्यास, आमिर खान लवकरच त्याच्या आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूरही असणार आहे. हा चित्रपट १२ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे आणि त्याची दुसरी पत्नी किरण रावसोबत घटस्फोट झाला त्यानंतर देखील तो खूप चर्चेत आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post