×

Wedding Bells | ‘शाळा’ चित्रपटातील ‘हा’ कलाकार अडकला लग्नाच्या बेडीत

सध्या मनोरंजन जगतात सगळीकडे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलियाच्या लग्नाचा बार उडाला होता. यामध्ये मराठी सिने जगतसुद्धा मागे नाही. मराठी चित्रपट जगतातही अनेक कलाकार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याआधी सर्वत्र गाजलेल्या शाळा चित्रपटाचा अभिनेता केतन पवार (Ketan Pawar) लग्नाच्या बेडीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साल २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाळा’ या मराठी चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. चित्रपटाची कथा, शाळेतील गमती जमती आणि बालवयात खुलणारी प्रेमकथा, अशा अनेक गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या होत्या. त्यामुळेच या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली होती. याच चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या मुकूंदच्या खास मित्राची म्हणजेच सूर्याची भूमिका केतन पवारने साकारली होती. केतनच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते तसेच या चित्रपटाने त्याला घराघरात प्रसिद्धीही मिळवून दिली होती. याच केतन पवारच्या लग्नाची बातमी समोर आली आहे.

अभिनेता केतन पवार मंगळवारी (२६ एप्रिल) त्याची खास मैत्रिण प्राचीसोबत लग्नबंधनात अडकला. या लग्न सोहळ्याला त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती. लग्नाचे काही खास फोटो केतनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या नव्या आयुष्यासाठी चाहत्यांनी तसेच कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान केतन पवारने शाळा चित्रपटाव्यतिरिक्त पोपट, कट्टी बट्टी, खोपा, रिंगण या सारख्या चित्रपटात काम केले आहे.अभिनयासोबतच केतन उत्कृष्ट तबला वादक देखील आहे. तबला वादनाचे त्याने प्रशिक्षण घेतले आहे. अनेक म्युजिक शो साठी तो तबलावादक म्हणून काम करताना दिसतो आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post