आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. त्याच्या उच्च दर्जाच्या अभिनयासाठी त्याचे नेहमीच कौतुक झाले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर खानने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत पहिले लग्न केले. त्याला रीनापासून एक मुलगा जुनैद आणि मुलगी इरा आहे.
आमिरने 2002 मध्ये रीनाला घटस्फोट दिला, त्यानंतर रीनाने दोन्ही मुलांचा ताबा घेतला. त्यानंतर अभिनेत्याने किरण रावशी लग्न केले आणि त्यांचा मुलगा आझाद राव खानचा जन्म 5 डिसेंबर 2011 रोजी सरोगसीद्वारे झाला. पुन्हा एकदा आमिर खानने २०२१ मध्ये पत्नी किरणपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
अलीकडेच अभिनेता रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट ‘चॅप्टर 2’ मध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान, जेव्हा आमिरला पुनर्विवाहाबद्दल विचारण्यात आले, त्याला पुन्हा लग्न करायचे आहे का, यावर आमिरने काय म्हटले बघा …
लग्नाबाबत आमिर म्हणतो की, लग्न हा एक कॅनव्हास आहे आणि ते ते कसे रंगवतात हे त्या दोन लोकांवर अवलंबून असते. मग रियाने त्याला विचारले, ‘तो पुन्हा लग्न करण्यास तयार होईल का?’ यावर तो म्हणाला, ‘मी आता ५९ वर्षांचा आहे, मला वाटत नाही की मी पुन्हा लग्न करू शकेन. आता थोडं अवघड आहे, माझ्या आयुष्यात यावेळी खूप नाती आहेत. मी पुन्हा माझ्या कुटुंबात सामील झालो आहे, मला मुले आहेत आणि मला भाऊ आणि बहिणी देखील आहेत.
रिया पुढे म्हणाली की, जर तुमची इच्छा असेल तर आयुष्याच्या या टप्प्यावरही तुम्ही कोणाशीही लग्न करू शकते. ती म्हणाली, ‘मी जर जाहिरात दिली की आमिर खान वधू शोधत आहे तर ? यावर आमिर म्हणाला, ‘वेळ तर नाहीये कारण माझ्या जवळच्या लोकांसोबत राहून मला खूप आनंद होतोय. मी एक चांगला माणूस बनण्याच्या दिशेने काम करत आहे.’ आमिर खानच्या आगामी कामांबद्दल सांगायचे तर, तो लवकरच ‘सीतारे जमीन पर’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
‘तू रावण का बनत आहेस…’, कंगना रणौतने अल्फा मेल या शब्दाचा खरा अर्थ सांगितला