‘दिल’च्या शूटिंगवेळी आमिरने माधुरीसोबत केले ‘असे’ काही; रागाने लाल झालेली माधुरी हॉकी स्टिक घेऊन धावली होती त्याच्या मागे

aamir-khan-while-doing-a-prank-spat-on-madhuri-dixit-hand-she-got-angry-an


सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने कलाकार अनेक दिवस एकमेकांसोबत रहात असतात. अशा वेळी त्यांच्यात खूप चांगली मैत्री होते. शिवाय जर कलाकारांनी एकमेकांसोबत एकापेक्षा अधिक सिनेमे केले असतील, तर त्यांची बॉन्डिग चांगली असणार यात वादच नाही. सिनेमाच्या सेटवर कलाकारांसोबत नेहमीच मजा मस्ती केली जाते. मात्र कधी कधी ही मस्ती अंगाशी देखील येते.

माधुरी दीक्षित आणि आमिर खान यांनी सोबत तीन सिनेमे केले. मात्र यांच्या ‘दिल’ सिनेमाच्या सेटवर आमिरने माधुरीसोबत एक प्रॅन्क केला आणि तो प्रॅन्क आमिरला खूप महागात पडला. माधुरी आणि आमिर या जोडीने ‘दिल’ हा सुपरहिट सिनेमा केला आहे. आजही या सिनेमाचे गाणे आणि सिनेमा प्रेक्षकांना लक्षात आहे. या सिनेमाने तुफान यश मिळवत अनेक पुरस्कार देखील जिंकले होते. याच सिनेमाच्या सेटवर आमिरने माधुरीसोबत एक प्रॅन्क केला होता.

आमिरने एका मुलाखतीदरम्यान या प्रॅन्कबद्दल सांगितले होते. यावेळी आमिर म्हणाला, “मी सेटवर नेहमीच अनेकांसोबतच प्रॅन्क करत असतो. ‘दिल’ सिनेमाच्या सेटवर असताना मी माधुरीला माझ्या प्रॅन्कची शिकार बनवण्याचे ठरवले. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात बघायला सुरुवात केली, जणू काही मी ज्योतिषीच आहे. तिचा हात बघताना मी तिला म्हणालो, की तू खूपच भावनिक आहेस. कोणीही तुला अगदी सहजतेने वेड्यात काढू शकतं. लोकं तुला वेड्यात काढतात आणि तू वेड्यात निघतेसही. जशी आता तू वेड्यात निघत आहेस. मी असे म्हणालो आणि तिच्या हातावर थुंकलो. ती खूप चिडली आणि माझ्यामागे पळाली. तिला हा प्रॅन्क बिलकुल आवडला नाही आणि तिने जवळच असलेली हॉकी स्टिक उचलली आणि माझ्यामागे पळाली.”

२०१६ साली माधुरीने देखील हा किस्सा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितला होता. मात्र नंतर माधुरीने आमिरला माफ करत पुन्हा असे न करण्याची ताकिब देखील दिली होती. माधुरी आणि आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर माधुरी सध्या ‘डान्स दिवाने’ या डान्स रियालिटी शोला जज करत आहे, तर आमिर आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.