बोल्डनेसचा तडका लावणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या आघाडीवर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ईशा तिच्या सिनेमांसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने नुकतेच ‘आश्रम ३’ वेबसीरिजमध्ये काम केले. यातील तिच्या बोल्डनेसने सर्वांनाच घायाळ केले. दुसरीकडे, ती सोशल मीडियावरही जबरदस्त सक्रिय असते. ईशा नेहमीच तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच नुकताच ईशाने एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बीचवर मस्ती करताना दिसली.
काळ्या रंगाच्या बिकिनीत ईशाने केला कहर
अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की, ईशा गुप्ता काळ्या रंगाच्या बिकिनीत दिसत आहे. ईशाच्या या व्हिडिओत ती समुद्रकिनारी बीचवर मस्ती करताना दिसत आहे. इतकेच नाही, तर तिची हॅट आणि बिकिनी तिच्यावर शोभून दिसत आहे. यासोबतच ईशाच्या हॉटनेसचा अंदाज या व्हिडिओतून सहजतेने लावला जाऊ शकतो.
सोशल मीडियावर ईशाचा हा बिकिनी व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. चाहते तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. ईशाच्या या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, सामान्य व्यक्तींपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. कोरिओग्राफर टेरेन्स लुईस याने कमेंट करत लिहिले की, “हाय गर्मी, हे सर्वांनाच जमू शकत नाही.” एक चाहता कमेंट करत म्हणाला की, “ईशा गुप्ता ही खरंच चांगली अभिनेत्री आहे.”
View this post on Instagram
ईशा आहे लाईमलाईटची राणी
नुकतीच बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) याची सुपरहिट वेबसीरिज ‘आश्रम ३’ (Aashram 3) यामधून चाहत्यांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमीच लाईमलाईटचा भाग असते. ती तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करते.
ईशाचे सिनेमे
ईशाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत १५ हून अधिक सिनेमात काम केले आहे. यामध्ये ‘जन्नत २’, ‘कमांडो २’, ‘राज ३’ आणि ‘बादशाहो’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझ्यात तेवढा दम नाही’, बॉलिवूडच्या तीन खानबद्दल करण जोहरचे खळबळजनक वक्तव्य
लव्ह मॅरेज करण्याचा विचार करताय? जरा थांबा आणि बघा अभिनेता राजकुमार रावची अवस्था