Saturday, June 15, 2024

सलमान खानचे लग्न न करण्यामागील ‘मोठे’ कारण आले समोर, दाजी आयुष शर्माने केला खुलासा

सलमान खानचे चाहते अनेक दिवसांपासून त्याच्या प्रोडक्शनमध्ये बनत असलेल्या ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या चित्रपटाची वाट बघत होते. अशातच त्याच्या चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. त्याचा हा चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आयुष शर्मा दिसत आहे. या चित्रपटात दोघेही एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. त्याचे चाहते सलमानच्या चित्रपटासोबत ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात की, तो लग्न कधी करणार आहे. याचा खुलासा त्याची बहीण अर्पिता हिचा पती आयुष शर्माने केला आहे. त्याने सलमान खान लग्न का करत नाही?, या मागील कारण सांगितले आहे.

आयुष शर्माने नुकतेच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानबाबत अशी गोष्ट सांगितली आहे, जी जाणून घेण्यासाठी त्याचे सगळे चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्याला तेव्हा सलमान खानच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने सांगितले की, “मी भाईसोबत त्याच्या लग्नाच्या विषयावर कधीच बोलत नाही. कारण, ज्याप्रकारे तो काम करत आहे. त्यावरून मला असे वाटते की, लग्नासाठी त्याच्याकडे वेळ नाहीये.” (Aayush Sharma opened the secret told why salman khan is not getting married)

सलमान खानबाबत त्याने सांगितले की, “मी त्याचे आयुष्य ज्याप्रकारे पाहिले आहे, त्यावरून मला असे वाटते की, तो त्याच्या आयुष्यात एकदम खुश आहे आणि त्याला त्याचे निर्णय स्वतःला घ्यायला आवडतात.”

आयुषने सांगितले की, “सलमान खान अत्यंत साधे आयुष्य जगतो. त्याची लाईफस्टाईल अगदी साधी आहे. ना त्याला मोबाईलची आवड आहे ना गाड्यांची. त्याला कपड्यांची देखील जास्त आवड नाहीये. त्याला केवळ चित्रपटांमध्ये आवड आहे. तुम्ही जर त्याला दोन-तीन तास एकट्याला सोडले, तर तो त्या वेळात देखील चित्रपट पाहतो.”

अशाप्रकारे आयुष शर्माने सलमान खानबाबत आणि त्याच्या लग्नाबाबत माध्यमांना माहिती दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’मधील ‘या’ स्पर्धकावर राखी सावंतचा पती फिदा; प्रपोज केल्यानंतर राखीची रिऍक्शन पाहण्यासारखी

-शिल्पा राजच्या ‘बुलेट पे जीजा’ गाण्याने यूटुबवर उडवली धमाल, ५० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

-माधुरी दीक्षितने मारला गुजराती जेवणावर ताव, ढोकळा अन् भाकरवाडीचा लुटला आस्वाद

हे देखील वाचा