Monday, July 15, 2024

सलमानच्या मेव्हण्याला आठवले जुने दिवस; सांगितलं, अर्पिताशी लग्न केल्यानंतर लोक काय म्हणायचे?

बाॅलिवूड अभिनेता आयुष शर्मा याने अलीकडेच सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्यासोबत लग्न केल्यानंतर त्याच्या आयुष्याबद्दल सांगितले आहे. लोक आयुषला ट्रोल करत होते, त्यावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता म्हणतो की, आजही लोक त्याला ‘सलमान खानचा मेव्हणा’ म्हणतात.

आयुष आहे दिल्लीचा उद्योगपती?
माध्यमांतील वृत्तानुसार, एका इव्हेंटमध्ये याबद्दल बोलताना आयुष(aayush sharma) याने सांगितले की, “लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लोक त्याला ट्रोल करत होते. काहींनी पैशासाठी अर्पिताशी लग्न केल्याचं म्हटलं, तर काहींनी अभिनेता होण्यासाठी हे केलं असल्याचे आराेप आयुषवर केला.” आयुषने त्यांला दिल्लीचे उद्योगपती म्हणत असल्याचेही सांगीतले, जाे की ताे नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

आयुशला अजूनही म्हणतात, ‘सलमान खानचा मेव्हणा’
आयुषने पुढे सांगितले की, “त्याने इंटरनेटवर त्याच्याबद्दल बाेलत असलेल्या बहुतेक गाेष्टींवर मात केली आहे. आता या गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.” अभिनेत्याने सांगितले की, “त्याला अजूनही ‘सलमान खानचा मेव्हणा’ म्हटले जाते.” आणि त्याने कबूल केले की, ताे स्टार किड नसतानाही त्याला बॉलिवूडमध्ये बाहेरच्या व्यक्तीप्रमाणे संघर्ष करावा लागला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

लग्नासाठी सलमानने दिला माेठा हुंडा
आयुषने चित्रपटांमधील अभिनयासाठी जज केल्याबद्दलही सांगितले. अभिनेत्याने खुलासा केला की, “त्याला ‘व्हाईट डॉग’ म्हटले जाते आणि सलमानने त्याच्या बहिणीशी लग्न करण्यासाठी त्याला भरपूर हुंडा दिला होता.” ज्याने त्याचा आत्मविश्वास कसा डळमळीत झाला हे देखील त्याने सांगीतले. अभिनेत्याने सांगितले की, “मी टीकेला सामोरे जाण्यास तयार आहे. मात्र, लोकांना माझे स्वप्न हिरावून घेण्याचा अधिकार मी काेणालाही देत नाही.”

आयुष अखेरचा दिसला ‘अँटीम: द फायनल ट्रुथ’ चित्रपटात
आयुषच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, ताे शेवटचा ‘अँटीम: द फायनल ट्रुथ’ मध्ये दिसला होता, ज्यामध्ये सलमान मुख्य भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘राम सेतू’ चित्रपट वाचवू शकेल का अक्षय कुमारची डुबती नय्या, ओपनिंग दिवशी जमेल का एवढा गल्ला?

पतीला चिअरअप करण्यासठी धनश्रीने गाठले ऑस्ट्रेलिया, पोस्ट शेअर करत उर्वशाला मारला टोमणा

हे देखील वाचा