रोहित शेट्टीचा स्टंट पाहून प्रेक्षकांना आवरेना हसू; पाहा रणवीर सिंगने शेअर केलेला मजेशीर व्हिडिओ

Bollywood Actor Ranveer Singh Shares Hilarious Video of Rohit Shetty From Set of Crikus


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘सिम्बा’ नंतर पुन्हा एकदा ‘सर्कस’ सिनेमात एकत्र काम करत आहेत. चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. रणवीरने नुकतेच चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने देशातील सर्वात ‘गंभीर कार स्टंट डायरेक्टर’ म्हणजेच रोहित शेट्टी शॉट्स दरम्यान काय करत असतो, सांगितले आहे. रोहित चित्रपटांमध्ये कारचा धोकादायक स्टंट दाखवण्यासाठी ओळखला जातो.

या व्हिडिओमध्ये रोहित छोटी गाडी चालवताना दिसत आहे. सुरुवातीला रोहित गाडीत पोज करताना दिसला. पण रणवीर व्हिडिओ बनवत असल्याचे समजताच त्याचे हावभाव बदलले.

हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना रणवीरने लिहिले, ‘रोहित नेहमी आपल्या कामाला अत्यंत गांभीर्याने घेतो.’ हा व्हिडिओ पाहून रणवीरचे मित्र आणि चाहते खूप हसत आहेत. अर्जुन कपूरने या पोस्टवर कमेंट केली, ‘बाबा हे पाहून वाटते की मला पुन्हा एकदा सर्कसमध्ये प्रवेश करावा लागेल’. याव्यतिरिक्त मनीष पॉल आणि वरुण शर्मा यांनाही हा व्हिडिओ खूप मजेशीर वाटला.

‘सर्कस’ हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या ‘द कॉमेडी ऑफ एरर’ वर आधारित आहे. या चित्रपटात वरुण शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, ब्रजेश हिरजे, अश्विनी कालेस्कर आणि मुरली शर्मा इत्यादी कलाकार दिसणार आहेत.

यासह रोहित त्याच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ आहेत. अजय देवगण आणि रणवीर सिंग या चित्रपटात गेस्ट अपिअरंसमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी मार्चमध्येच प्रदर्शित होणार होता, परंतु कोविड-19 या साथीच्या आजारामुळे चित्रपटाचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले. आता बातमी येत आहे की, हा चित्रपट यंदा 2 एप्रिल रोजी रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.