×

‘खिलाडी’ अक्षय कुमारने घेतली बीएसएफ जवानांची भेट; शाळेसाठी दिले १ कोटी रुपये; सोबतच केला भांगडा डान्स

बॉलिवूडचा सर्वात फिट आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून अक्षय कुमार ओळखला जातो. चित्रपटांसोबतच अक्षय त्याच्या समाजकार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. अक्षय बहुतकरून जवानांसाठी केलेल्या कामाबद्दल ओळखला जातो. अक्षयचे जवानांनवर विशेष प्रेम आहे. तो अनेकदा जवानांच्या भेटीसाठी जात असतो. जवानांसोबत वेळ घालवणे, त्यांच्याशी चर्चा करणे अक्षयच्या आवडत्या कामांपैकी एक आहे. अक्षयच्या चित्रपटांमध्ये देखील त्याच्या देशभक्तीची झलक आपल्याला पाहायला मिळते.

नुकताच अक्षय काश्मीरमधल्या जवानांना भेटायला पोहोचला होता. या भेटीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अक्षय काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात दुपारी बाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने तिथे पोहोचला. त्यावेळी अक्षयने बीएसएफ सैनिकांशी संवाद साधला. अक्षयसोबत यावेळी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत सैनिक आणि सैन्य अधिकारीही उपस्थित होते. अक्षयने त्यांच्यासोबत भांगडाही केला.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने देखील या भेटीचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने लिहिले की, “बीएसएफ जवानांसोबत मी एक अविस्मरणीय दिवस घालवला. बीएसएफचे सैनिक आज आपल्या सीमेचे रक्षण करत आहेत. येथे आल्यावर मी नेहमीच विनम्र होतो. या हिरोंना भेटल्यावर माझ्या मनात फक्त आदर असतो.”

शिवाय बीएसएफने देखील त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अक्षय कुमारच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राकेश अस्थाना आणि अक्षय कुमार देशाच्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. फोटोंसोबत बीएसएफने लिहिले की, “बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांनी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सीमा प्रहरींना एका समारंभादरम्यान पुष्पांजली अर्पण केली. सोबतच अक्षय कुमारनेही शहिदांना श्रद्धांजली वाहिली.”

बीएसएफ काश्मीरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अक्षयचा एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ट्वीट करताना त्यांनी लिहिले की, “देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना भेटण्यासाठी आला आहे.”

यावेळी अक्षयने काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील नीरु गावातील शाळेच्या निर्माणासाठी १ कोटी रुपये देणगी म्हणून दिले. आगामी काळात अक्षयचे ‘बेल बॉटम’ आणि ‘सुर्यवंशी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला

-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

-यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित

Latest Post