Friday, July 5, 2024

अलीने केली ‘बिग बाॅस 16’ मधून साजिद खानला काढायची डिंमाड, पाेस्ट तुफान व्हायरल

टीव्ही रिऍलिटी शो ‘बिग बॉस 16‘ मधील चित्रपट निर्माता साजिद खान फारच चर्चेत आहे. त्याला लवकरात लवकर शोमधून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी प्रेक्षकांची आहे. आता या यादीत बॉलिवूड अभिनेता अली फजल याचेही नाव जोडले गेले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने साजिद खानला शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे, ज्याची चर्चा प्रचंड रंगली आहे. 

अली फजल (ali fazal) याने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून साजिद खानला सलमान खानच्या शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये साजिदच्या फोटोखाली एक लायटर आहे, ज्यामुळे साजिदच्या फोटोला आग लागली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “साजिद खानला आता बिग बॉसमधून बाहेर काढा.” याशिवाय त्याने #MeToo  देखील वापरला आहे.

ali fazal

याआधी सोना महापात्रा, तनुश्री दत्ता, शर्लिन चोप्रा, उर्फी जावेद, नेहा भसीन आणि मंदाना करीमी या सेलिब्रिटींनीही साजिद खानला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली हाेती. अनेकांनी सोशल मीडियावर साजिदच्या विरोधात पोस्ट शेअर केली आणि शोमध्ये कास्ट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शर्लिनने पुन्हा एकदा साजिदबद्दलचा तिचा जुना अनुभव शेअर करत त्याला शोमध्ये घेऊ नये असे सांगितले.

दुसरीकडे, या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनीही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिले होते. या पत्रात स्वाती मालीवाल यांनी #MeToo चळवळीदरम्यान आरोपांनी घेरलेले चित्रपट निर्माता साजिद खानला ‘बिग बॉस 16’ मधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.

साजिद खानवर मनोरंजन विश्वातील अनेक महिलांनी  शोषणाचा आरोप केला आहे. #MeToo चळवळीदरम्यान, अनेक महिला सेलिब्रिटींनी साजिदविरोधात आराेप केले, त्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली. सलोनी चोप्रा, शर्लिन चोप्रा, मंदाना करीमी, डिंपल पॉल आणि आहाना कुमरा यांच्यासह इतर महिलांनी शोषणाचा आरोप केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
जगाचा निरोप घेणाऱ्या वैशालीने जाता जाता दुसऱ्याला दिले जीवदान! तुम्हीही कराल कौतुक

करण सिंग ग्रोवरच्या टॅलेंटला ताेड नाही, व्हिडिओ पाहूण चाहते झाले हैराण

हे देखील वाचा