Saturday, August 8, 2026
Home बॉलीवूड गोविंदासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, पत्नी सुनीता आहुजा यांनी यापूर्वी लावले होते अफेअरचे आरोप

गोविंदासोबत दिसली मिस्ट्री गर्ल, पत्नी सुनीता आहुजा यांनी यापूर्वी लावले होते अफेअरचे आरोप

चित्रपट सृष्टी मध्ये 90 च्या दशकात चित्रपट गाजवणारा अभिनेता म्हणजे गोविंदा, सध्या तो त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यबाबत चर्चा चालू आहे. काही काळापासून तो चित्रपटसृष्टीमध्ये दिसत नाहीये. मात्र त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने गोविंदावर विवाहबाह्य संबंध असल्याचा वारंवार आरोप केला आहे. इतकेच नाही तर, सुनीताने नेटफ्लिक्सच्या ‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोमध्येही दावा केला होता की, गोविंदाचे अनेक अफेअर्स होते, मात्र तिने असेही म्हणले की, काहीही झाले तरी मी त्याची साथ कधीही सोडणार नाही. तर याच दरम्यान आता गोविंदा मुंबई विमानतळावर एका महिलेसोबत दिसला, ज्यामुळे हि महिला कोण आहे, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

अलीकडेच, गोविंदा (govinda)मुंबई विमानतळावर एका अपरीचीत महिलेसोबत दिसला. ही मुलगी सतत गोविंदासोबत चाहताना दिसत होती आणि तिला पाहिल्यानंतर लोकांना अनेक प्रतिक्रिया दिल्या, कमेंट्स मध्ये अनेकानी विचारल की, ती कोण आहे. असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही तिला ओळखत नसाल तर त्या महिलेचे नाव कोमल राणी स्वर्णकर आहे, गोविंदा आणि कोमलचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी यांनी शेअर केला आहे, यामुळे अनेक लोक आता या प्रंसगावर चर्चा करत आहेत.

सध्याच्या परीस्थतीवर पाहायचे झाल्यास सुनीता आहुजा यांनीही एका मुलाखती दरम्यान कोमल नावाच्या मुलीचा उल्लेख केला होता. जानेवारीमध्ये मिस मालिनीसोबतच्या गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधावर चर्चा करताना सुनीता म्हणाल्या होत्या, मला ते नाव अजिबात आवडत नाही. जर मला कोणताही पुरावा सापडला, तर मी गोविंदाला कधीही माफ करणार नाही.” सुनीता यांनी अलीकडेच ‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोमध्ये दावा केला होता.

हेही वाचा

थलपथी विजय यांच्या संसारात नवा द्विस्ट, संगीता यांनी घटस्फोटाची याचिका घेतली मागे

 

हे देखील वाचा