Thursday, September 3, 2026
Home बॉलीवूड ‘हाल कैसा है जनाब का?’, म्हणत अर्जुन कपूरने स्टायलिश फोटो केला शेअर, नेटकरी म्हणाले, ‘मलायका मॅडमला विचारावे लागेल’

‘हाल कैसा है जनाब का?’, म्हणत अर्जुन कपूरने स्टायलिश फोटो केला शेअर, नेटकरी म्हणाले, ‘मलायका मॅडमला विचारावे लागेल’

बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर विशेषतः चित्रपटातील अभिनयासाठी, तसेच त्याच्या ऍक्शनसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याच्या फिटनेसच्या पोस्ट पाहून चाहत्यांचा उत्साह वाढतो. तसेच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. अर्जुन त्याच्या आणि मलायका अरोराच्या अफेअरमुळे देखील सतत चर्चेत असतो. मलायका प्रमाणेच अर्जुन कपूर देखील सध्या त्याच्या फिटनेसवर खूप लक्ष देत आहे. अर्जुनने मेहनत करून आणि तासभर जिममध्ये घाम गाळून खूप वजन कमी केले आहे. तसेच तो त्याच्या फॅशन सेन्समुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अर्जुन कपूरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने कुर्ता आणि त्यावर कोट घातलेला दिसत आहे. या फोटोमध्ये त्याच्या केसांची स्टाईल देखील वेगळी दिसत आहे. तो अत्यंत हँडसम दिसत आहे. (Bollywood actor arjun kapoor share his stylish look on social media)

हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “हाल कैसा है जनाब का?” त्याचे चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “हेअर स्टाईल खूप सुंदर दिसत आहे.” तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मलायका मॅडमला विचारावे लागेल.” अशाप्रकारे या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तो या आधी शेवटचा ‘भूत पोलीस’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. अर्जुन कपूर आता मोहित सुरीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानीसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेसचा कहर! सनी लिओनीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर राडा; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक’

-दाक्षिणात्य अभिनेत्री अमायरा दस्तूरने बिकिनी फोटोत केला कहर; पाहून चाहताही म्हणाला, ‘देवाने मला…’

-भारीच ना! अक्षरा सिंगचे ‘दिल की पुकार’ गाणे चाहत्यांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले लाखो हिट्स

हे देखील वाचा