बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील निर्माता आणि दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा मुलगा आणि अभिनेता अरमान कोहली याचा भाऊ रजनीश कोहली याचे बुधवारी (7 एप्रिल) दुःखद निधन झाले आहे. वृतपत्रांच्या माहितीनुसार रजनीश हा अनेक दिवसांपासून आजारी होता. ही बातमी ऐकल्यानंतर अरमान कोहलीचे अनेक चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून रजनीशला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
रजनीश हा चित्रपटसृष्टीपासून लांब होता. पण त्याचा भाऊ अरमान याच्या खूप जवळ होता. त्या दोघांमध्ये भावासोबतच मैत्रीचे नाते होते. रजनीश हा केवळ 40 वर्षांचा होता. सूत्रांच्या माहितीनुसार त्याचा मृत्यू किडनी फेल झाल्यामुळे झाला आहे. अरमान याने त्याच्या भावाला गेल्या 40 वर्षापासून लहान मुलाप्रमाणे सांभाळले. अरमान त्याच्या छोट्या भावावर खूप प्रेम करत असे. त्याच्या सगळ्या इच्छा अपेक्षा तो पूर्ण करत असे. रजनीश हा शारीरिकदृष्ट्या अपंग होता. तो 14 वर्षाचा असताना त्याच्यासोबत एक अपघात झाला होता. तेव्हापासून तो व्हील चेअरवर आहे. तो व्हील चेअरवर बसून संपूर्ण घरात फिरत असे. त्याच्या मृत्युने अरमान याला खूप दुःख झाले आहे.
अरमान आणि रजनीश यांचे वडील राजकुमार कोहली हे एक नावाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बनवले आहेत. त्यांनी ‘जानी दुश्मन’, ‘नागीण’, ‘राज तिलक’ यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.
अरमान कोहली याने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले आहे. तसेच तो ‘बिग बॉस 7’चाही स्पर्धक होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










