Monday, July 1, 2024

‘बोले तो एकदम कडक!’ अर्शद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना

कलाकारांना आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये वेगवेगळी भूमिका साकारायची असते. त्यासाठी त्यांना आपल्या संपूर्ण देहबोलीमध्ये देखील बदल करावा लागतो. कधी त्यांना अगदी बारीक व्हावे लागते तर, कधी खूप जाड. काही कलाका तर भूमिका चांगली साकारता यावी म्हणून टक्कल देखील करतात. अशात सध्या अर्शद वारसीचा नवीन लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अनेक चित्रपटांमधून आपल्या खलनायकाच्या आणि विनोदी भूनिकेने रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अर्शद आता आपल्या अनोख्या अंदाजामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. अभिनेत्याने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे नवीन लूकमधील काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बारीक सारीक सर्किटची आता भल्याभल्याना लाजवेल अशी शरीयष्टी तयार झाली आहे. (Actor Arshad Warsi share his new look fans compare to John Cena)

त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी खूप प्रेम व्यक्त केले. अनेकजण त्याला याविषयी प्रश्न देखील विचारत आहेत. कोणत्या चित्रपटामध्ये तो या नवीन लूकमध्ये झळकणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. अशात त्याने हे फोटो पोस्ट करत, हा लूक त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी असल्याचे सांगितले आहे. परंतु त्याचा आगामी प्रोजेक्ट नेमका कोणता आहे या बदल त्याने अद्याप, तरी काही खुलासा केला नाही.

अर्शदने आपल्या विनोदी अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपली दमदार भूमिका निभावली. परंतु त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटामधून. त्यामुळे अनेक जण त्याच्या या लूकवर कमेंट करत लिहीत आहेत की, “भाई बोले तो एकदम कडक.” तसेच दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “आइला सर्किट भाई अब मुन्ना भाई माफिक बॉडी बनाइला है.” तर आणखी एकाने लिहिले की, “सर्किट बना मुन्ना भाई.” त्याच्या या लूकची तुलना जॉन सीनासोबत देखील केली गेली. एक चाहता म्हणाला की, “अशी बॉडी, तर जॉन सीनाची देखील नाही सरजी.”

अभिनेत्याने नुकतेच आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यामध्ये तो अक्षय कुमारसोबत अभिनय करताना दिसणार आहे. हा चित्रपट २६ जानेवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचा लूक ‘असुर’ वेब सीरिजच्या पुढील पर्वासाठी असल्याचे देखील अनेक चाहते म्हणत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर

-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा