Saturday, December 7, 2024
Home अन्य ‘पाताल लोक’ अभिनेता आसिफ बसरा यांचा धर्मशालेत आत्महत्या

‘पाताल लोक’ अभिनेता आसिफ बसरा यांचा धर्मशालेत आत्महत्या

शिमला: बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये (आज) गुरुवारी मृत अवस्थेत आढळले. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. ५३ वर्षीय अभिनेते एका संकुलामध्ये मध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळले.

या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

एसएसपी कांगड़ा, विमुक्त रंजन यांनी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार “अभिनेता असिफ बसरा हे धर्मशालेत एका खासगी संकुलात लटकलेले आढळले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.”

 

आसिफ शेवटी डिस्ने प्लस हॉटस्टार मालिका होस्टिजेजच्या दुसर्‍या सत्रात दिसले होते. या वर्षाच्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या ऍमेझॉन प्राइमच्या ‘पाताल लोक’ मध्ये मीडिया हाऊसमधल्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याची भूमिका देखील उत्तम रंगवली होती. आसिफला ‘जब वी मेट’, ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’, ‘क्रिश ३’, ‘एक व्हिलन’ आणि बर्‍याच सिनेमांमध्येही आपण पाहिले आहे.

सविस्तर माहिती काही वेळातच! 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा