ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) २६ वर्षांच्या कालावधीनंतर बंगाली चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहेत. ते शेवटचे ऋतुपर्णो घोष यांच्या ‘बारिवली’ या चित्रपटात दिसले होते.
आयएएनएसच्या वृत्तानुसार, अनुपम खेर यांची कंपनी, अनुपम खेर स्टुडिओज, फ्रेंड्स कम्युनिकेशन्स आणि निर्माते फिरदौसूल हसन यांच्या सहकार्याने एका नवीन बंगाली चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचे नाव “शुरू थेके शुरू” असे आहे.
अनुपम खेर यांनी खुलासा केला की, २६ वर्षांपूर्वी त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांच्यासोबत ‘बारिवली’ नावाच्या एका बंगाली चित्रपटासाठी काम केले होते. ते आता हा नवीन चित्रपटही त्याच ठिकाणाहून सुरू करत आहेत. ते केवळ चित्रपटच बनवत नाहीत, तर त्यांना बंगालमध्ये एक अभिनय शाळाही सुरू करायची आहे.
बंगालच्या मुख्यमंत्र्यांनीही या नवीन प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपम खेर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना बंगालच्या चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर न्यायचे आहे आणि या प्रयत्नात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.
७१ वर्षीय अनुपम खेर यांनी बंगालच्या कला आणि संस्कृतीची प्रशंसा केली. बंकिमचंद्र चटर्जी, सत्यजित रे आणि मृणाल सेन यांसारख्या महान कलाकारांकडून संगीत आणि चित्रपटसृष्टीबद्दल खूप काही शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अनुपम खेर यांनी २६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बारीवाली’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात त्यांच्या पत्नी किरण खेर यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










