Friday, June 14, 2024

साेनू सूद लाेकांना मदत करण्यासाठी इतके पैसे आणताे तरी कुठून? अखेर अभिनेत्यानं केला खुलासा, म्हणाला…

सोनू सूद बॉलिवूडमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र, आपल्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी आपल्या दिलदारपणाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. खरं तर, कोरोना महामारीच्या काळात सोनू सूद लोकांसाठी मसिहा बनून समोर आला हाेता. त्यामुळे देशभरातील लोकांसाठी तो केवळ कलाकारच राहिला नाही, तर खरा ‘हिरो’ बनला आहे. अशात सोनू सूदने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे की, त्याने इतक्या लोकांना कशी मदत केली आहे.

सोनू सूदने सांगितले की, “जेव्हा मी लोकांना मदत करण्याचे काम सुरू केले, तेव्हा मला कल्पना नव्हती की, ज्या प्रकारे लोकांची डिमांड येत आहे, त्यानुसार आम्ही लोकांना मदत करण्यासाठी दोन दिवसही टिकू शकू. मात्र, यात कशी भर घालायची याचा मी विचार केला आणि मी काम करत असलेल्या सर्व ब्रँडना देणगी देण्यास प्रवृत्त केले. या कामासाठी मी हॉस्पिटल, कॉलेज, शिक्षक, फार्मास्युटिकल कंपन्यांमधील डॉक्टरांचे मन वळवले आणि सर्वांनी मला मदत केली. मी म्हणालो, ‘ब्रँडमध्ये अपीयरेंस हवे, मी फ्रीमध्ये काम करेन’, म्हणून ते लोक या कामात सहभागी होऊ लागले आणि हे काम होत गेले.”

याशिवाय सोनू सूदने सांगितले की, “काही मोठ्या एनजीओनेही माझ्याशी संपर्क साधला आणि ते म्हणाले, ‘सोनू, देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. यात तुम्ही टिकू शकणार नाही’. त्यानंतर मी म्हणालाे, ‘जे लाेक माझ्या घराखाली येतात त्यांना मी नाकारू शकत नाही. आज जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत, मग तो कोणत्याही लहान जिल्ह्यातला असो, कोणत्याही छोट्या राज्यामधला असो, किंवा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो. मी कोणालाही शिकवू शकतो, मी कोणावरही उपचार करू शकतो, मी कोणालाही नोकरी देऊ शकतो. त्यांनी फक्त मला फोन करावा, मी त्यांची अडचण दूर करून देईन.”

ज्या दरम्यान संपूर्ण देश कोरोना महामारीमुळे लढत होता आणि सर्वत्र लॉकडाऊन होतं. त्यावेळी अभिनेता सोनू सूदने प्रकृतीची पर्वा न करता देशातील जनतेला मदत केली होती. कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे घरापर्यंत पोहोचू न शकलेल्या लाेकांना घरी पाेहचवून देण्याची जबाबदारी अभिनेत्यांनी घेतली होती आणि ती यशस्वीही झाली. (bollywood actor sonu sood reveal from where did he get money to help other people at the time of covid lockdown )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तर ‘या’ कारणासाठी अनिल कपूर करायचे श्रीदेवी यांना वाकून नमस्कार, स्वतःच केला होता खुलासा

कुशल बद्रिकेने शेअर पोस्ट करत लिहिले, ‘गोष्ट वडील मुलीच्या अतूट नात्याची…’

हे देखील वाचा