‘नेक्स्ट टाईम एकदाच सांगेन…’, फोटोग्राफर्सने हद्द पार करताच भडकला साऊथ सुपरस्टार

0
109
Siddharth
Photo Courtesy : Twitter/tiwari_ashu11

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये तो फोटोग्राफर्सवर रागावताना दिसत आहे. मुंबईतील एका सलूनमधून बाहेर आल्यावर पॅपराजी त्याच्यासोबत चालू लागले. यानंतर सिद्धार्थला राग अनावर झाला आणि त्याने फोटोग्राफर्सला खडसावले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यावर सिद्धार्थ (Siddharth) संतापला आणि म्हणाला, “मला हे सर्व आवडत नाही, पुढच्या वेळी मी सभ्यपणे बोलणार नाही.” त्यानंतर तो न थांबता निघून गेला. सिद्धार्थनंतर अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हीदेखील सलूनमधून बाहेर पडताना दिसली. तिने पॅपराजींना पोझही दिल्या.

‘मला हे आवडत नाही’
व्हिडिओमध्ये सिद्धार्थ (Siddharth Suryanarayan) ऑलिव्ह ग्रीन टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या पॅंटमध्ये दिसत आहे. त्याने गडद सनग्लासेस असलेला मास्कही घातला होता. बाहेर जाताना तो म्हणाला, “बॉस, मला हे सर्व आवडत नाही, मी बाहेरगावचा आहे. या मार्गाने जा.”

‘मी सभ्यपणे एकदाच सांगेन’
त्यानंतर पॅपराजी त्याच्यासोबत फिरत राहिले. यावर तो म्हणाला, “मी खूप सभ्यपणे एकदा सांगेन. मला हे सर्व आवडत नाही. इथल्या लोकांना घेऊन जा. पुढच्या वेळी मी नम्रपणे बोलणार नाही.” त्यानंतर तो गाडीत बसतो.

अदितीने दिल्या पोझ
अदिती सलूनमधून बाहेर आली, तेव्हा बाहेर फोटोग्राफर्स उभे होते. जेव्हा पॅपराजींनी तिला पोझ देण्यास सांगितले, तेव्हा अदितीने हसत हसत पोझ दिली आणि अभिवादनही केले.

डेटिंगबद्दल चर्चा
रिपोर्ट्सनुसार, अदिती आणि सिद्धार्थ गेल्या वर्षी ‘महासमुद्रम्’ (Maha Samudram) सिनेमाच्या सेटवर भेटल्यापासून ते डेट करत आहेत. मात्र, दोघांनीही या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या वर्षी हे दोघेही राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नात एकत्र पोहोचले होते. अदितीने त्याच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थसोबतचा एक फोटोही पोस्ट केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘मला लाज नाही वाटत, माझे वडील मुख्यमंत्री असताना मी ४-५…’, रितेशचे रोखठोक विधान
क्रिकेट खेळताना झाली होती लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांची भेट; मैत्री इतकी खास की, एकाचवेळी पडलेले प्रेमात
संगीतविश्वाला ‘या’ सिनेमामुळे मिळाली विशाल- शेखर जोडी, आयपीएलचं अँथम साँग बनवण्यात उचलला मोलाचा वाटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here