Saturday, April 20, 2024

‘मला नाही राहायचं!’ १३ महिन्यांनंतर ‘इतक्या’ कोटींचं नुकसान सोसत अर्जुनने विकला मलायकाच्या बिल्डिंगमधला फ्लॅट

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूडमधील सगळ्यात चर्चित जोड्यांपैकी एक आहेत. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार असल्याच्याही चर्चा आहेत. मागील वर्षी अर्जुन याने मलायकाच्या घराजवळ ४ बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, आता त्याच्या घराविषयी मोठी बातमी समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने हा फ्लॅट आता विकला आहे. हा फ्लॅट अर्जुनने ८१ ऑरेंट बिल्डिंगच्या १९व्या मजल्यावर घेतला होता. ४३६४ स्क्वेअर फूटचा हा फ्लॅट त्याने २० कोटींमध्ये खरेदी केला होता.

अर्जुनला कोट्यवधी रुपयांचं नुकसान
अर्जुन कपूर याने ४ कोटींचे नुकसान सहन करत हा फ्लॅट सोळा कोटींना विकला आहे. अर्जुनने हा फ्लॅट १९ मे रोजी रजिस्टर केला होता. अर्जुनची बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) हिने कागदपत्रांवर सही केली होती. अर्जुन कपूर जुहूच्या रहेजा ऑर्किडच्या सातव्या मजल्यावर राहतो. अर्जुनने सध्या त्याच्या घराविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाहीये.

अर्जुनच्या घराजवळ राहतात नावाजलेले सेलिब्रिटी
अर्जुन कपूरने फ्लॅट विकण्याच्या एक आठवड्याआधी करण कुंद्रा (Karan Kundra) याने १४ कोटी रुपयांना त्याच बिल्डिंगमध्ये फ्लॅट विकत घेतला होता. मार्च २०२० मध्ये सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिनेदेखील त्याच बिल्डिंगच्या १६व्या मजल्यावरील फ्लॅट १४ कोटींना विकत घेतला होता. यासोबतच क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw) याने देखील फ्लॅटसाठी १०.५ कोटी रुपये दिले आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मुलगा फराज मलिक (Faraz Malik) यानेही याच बिल्डिंगमधील १९व्या मजल्यावरील फ्लॅट ९.९५ कोटी रुपयांना खरेदी केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

‘भूत पोलीस’मध्ये झळकलेला अर्जुन कपूर
अभिनेता अर्जुन कपूर हा शेवटचा सन २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूत पोलीस’ या सिनेमात झळकला होता. याव्यतिरिक्त तो आता ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या आगामी सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मिनी ड्रेसमध्ये दिसली ‘डार्लिंग’ आलिया, सोशल मीडियावर रंगलीय बेबी बंपमधील फोटोंची चर्चा
‘नेक्स्ट टाईम एकदाच सांगेन…’, फोटोग्राफर्सने हद्द पार करताच भडकला साऊथ सुपरस्टार
‘मला लाज नाही वाटत, माझे वडील मुख्यमंत्री असताना मी ४-५…’, रितेशचे रोखठोक विधान

हे देखील वाचा