‘मला लाज नाही वाटत, माझे वडील मुख्यमंत्री असताना मी ४-५…’, रितेशचे रोखठोक विधान

0
90
Riteish-Deshmukh
Photo Courtesy: Instagram/riteishd

अभिनेता रितेश देशमुख हा सध्या बॉलिवूडपासून लांब असला तरी सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. त्याच्या भन्नाट व्हिडिओंमुळे तो नेहमीतच चर्चेत असतो. कमर्शिअल सिनेमा असो किंवा कॉमेडी रितेशने प्रत्येक भूमिका मनापासून निभावली आहे. हे खरं आहे की, स्वतंत्र नायक म्हणून त्याचे कोणतेही हिट सिनेमे नाहीत. परंतु त्याने ज्या भूमिका केल्या त्याचं सोनं केलं आणि बरेच प्रयोगही केले. काही दिवसांपूर्वी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रितेशला जेव्हा त्याच्या सिनेमातील भूमिकांविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं जे उत्तर दिलं ते अतिशय लक्ष वेधून घेणारं होतं.

रितेश, सेक्स कॉमेडी आणि परिवार
रितेशने (Riteish Deshmukh) सांगितले की, त्याने त्यावेळी सेक्स कॉमेडी (Sex Comedy Movie) सिनेमांमध्ये काम केलं होतं, ज्यावेळी त्याचे वडील विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तो म्हणाला की, “मी एकुलता एक अभिनेता आहे, ज्याने ४ ते ५ सेक्स काॅमेडी सिनेमे केले आहेत. मला याची अजिबात लाज वाटत नाही. एका वेळेनंतर मला इतर कोणत्या ऑफर येतच नव्हत्या. माझी मुलं भविष्यात माझ्याबद्दल काय विचार करतील याचा मी अजिबात विचार केला नाही. माझे वडील मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हे केलं. माझ्या आई-वडिलांनीही मला कधी अडवलं नाही.”

मुलांना स्टारडम समजत नाही
रितेशची मुलं राहिल आणि रियानबद्दल त्याने सांगितलं की, त्या दोघांना माहितच नाही की, त्यांचे वडील काय करतात. तो म्हणतो की, “माझी मुलं अजूनपर्यंत हे समजू शकली नाहीत की, लोक माझ्यासोबत फोटो का काढतात.” मुलांनी सिनेमे पाहिले, तर काय असा विषय निघतो? असा प्रश्न विचारला असता, त्यावर रितेशचं एवढंच म्हणणं आहे की, “त्यांना माझ्या कामाविषयी सध्यातरी काहीच कल्पना नाही.”

रितेशचे सेक्स कॉमेडी सिनेमे
रितेशच्या सेक्स कॉमेडी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये ‘मस्ती’, ‘ग्रॅंड मस्ती’, ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘क्या सुपर कूल हैं हम’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
क्रिकेट खेळताना झाली होती लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांची भेट; मैत्री इतकी खास की, एकाचवेळी पडलेले प्रेमात
संगीतविश्वाला ‘या’ सिनेमामुळे मिळाली विशाल- शेखर जोडी, आयपीएलचं अँथम साँग बनवण्यात उचलला मोलाचा वाटा
‘सख्खे भाऊ, पक्के वैरी’ म्हणीला फाट्यावर मारणारे साजिद-वाजिद, ज्यांनी सलमानलाही बनवले सुपरस्टार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here