‘लहान-मोठं कोणी नाही’ म्हणतं सुपरस्टार धर्मेंद्रने केले मजुरांसोबत काम, पाहा व्हिडीओ

Actor dharmendra enjoying working with laborers at his farm house video viral on internet


बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध सिताऱ्यांपैकी एक असलेले धर्मेंद्र चित्रपटांपासून सध्या दूर आहेत. धर्मेंद्र त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. धर्मेंद्र यांची पोस्ट लोकांना इतकी आवडते की त्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला अजिबात वेळ लागत नाही.

सध्या धर्मेंद्र त्यांच्या फार्म हाऊसवर वेळ घालवत आहेत. नुकतेच धर्मेंद्र यांनी त्यांच्या फार्म हाऊसवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते फार्म हाऊसमधील मजुरांसह एकत्र काम करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, कशाप्रकारे धर्मेंद्र काही मजुरांसोबत मिळून त्यांच्या फार्म हाऊसवर काम करत आहेत. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “फार्म हाऊसवर काम करताना आम्ही असाच एन्जॉय करत असतो. सभ्य आणि दयाळू राहा. या जगात कोणी लहान नाही किंवा मोठे नाही. हे जग खूप सुंदर होईल, मित्रांनो. तुम्हा सर्वांवर माझे प्रेम आहे.”

धर्मेंद्र यांच्या या व्हिडिओवर चाहते नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. धर्मेंद्र यांना निसर्गाची खूप आवड आहे आणि याबद्दल त्यांनी बर्‍याचदा उल्लेखही केला आहे. धर्मेंद्र त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या फार्महाऊसवर घालवतात. 84 वर्षीय धर्मेंद्र काही खास प्रसंगीच मुंबईला जातात आणि नंतर आपल्या फार्महाऊसमध्ये परत येतात. धर्मेंद्र यांनी लॉकडाऊनचा संपूर्ण काळ स्वत: च्या फार्महाऊसमध्येच घालवला आहे. तसेच, धर्मेंद्र यांचे हे फार्महाऊससुद्धा खूपच सुंदर आहे आणि अभिनेता वेळोवेळी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात.

हेही वाचा- लोणावळ्यात आहे १०० एकरचे फार्महाऊस, पाहा बॉलीवूड स्टार धर्मेंद्रच्या करोडो रुपयांच्या फार्महाऊसचे फोटो


Leave A Reply

Your email address will not be published.