Sunday, October 1, 2023

सलग पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चाच डंका, केली एवढ्या कोटींची कमाई

7 सप्टेंबरला रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या (shahrukh khan)  ‘जवान’ चित्रपटाने गेल्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुखचा जवान हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेविश्वासाठी नवे मापदंड प्रस्थापित करत आहे यात शंका नाही. जवान, पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई करून, हिंदी चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक कलेक्शन करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ‘जवान’ चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर 53 कोटींची कमाई केली.

जवानने चार दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर 350.47 कोटी रुपयांची कमाई केली. जागतिक बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा गल्ला पार करणारा हा सर्वात जलद चित्रपट ठरला आहे. जवानने पहिल्या 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. भारतात 286.16 कोटींची कमाई केली. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला 5 व्या दिवशी जवानचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑक्युपन्सी सांगणार आहोत. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, जवानने पाचव्या दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये 30.00 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. म्हणजेच या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 316 कोटींचा आकडा पार केला आहे.

सोमवार असूनही, 11 सप्टेंबर 2023 रोजी ‘जवान’चा 27.06% होता. शाहरुखच्या चित्रपटाने सोमवारची कसोटी धमाकेदारपणे पार केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जवान हा चित्रपट साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली कुमार यांनी बनवला आहे, ज्यामध्ये शाहरुखशिवाय साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा दिसली आहे. इतकंच नाही तर विजय सेतुपतीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…
‘जवान’च्या यशावर अक्षय कुमारने दिल्या शुभेच्छा; शाहरुख म्हणाला, ‘तू प्रार्थना केली होती मग..’
डिलिव्हरीसाठी जाताना स्वतः गौहर खानने चालवली होती गाडी, अभिनेत्रीने शेअर केला ‘तो’ अनुभव

हे देखील वाचा