सुप्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. महेश यांनी अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी चित्रपटसृष्टीला खूप चांगले चित्रपट दिले आहे. त्यांनी सोमवारी (१६ ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा केला. त्यांनी ६३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने त्यांनी एक भव्य अशी वाढदिवसाची पार्टी केली होती. ज्यात बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान देखील उपस्थित होता. त्याचबरोबर इंडियन आयडॉल १२ चा विजेता पवनदीपने या पार्टीला चार चाँद लावले होते.
पवनदीपसोबत शोच्या इतर काही स्पर्धकांना देखील या पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. सध्या या पार्टीमधील एक फोटो समोर आला आहे. ज्यात हे सर्व लोक सलमानसोबत पोझ देताना दिसत आहेत. (Actor-director Mahesh Manjrekar’s birthday party with Salman Khan and Indian Idol contestants also attend)
पवनदीप आहे सलमान खानचा चाहता
‘इंडियन आयडल १२’ चा ग्रँड फिनाले रविवारी (१५ ऑगस्ट) तब्बल १२ तास चालला होता. ज्यात पवनदीप राजन शोचा विजेता ठरला. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पवनदीपने खुलासा केला होता की, तो सलमान खानचा मोठा चाहता आहे. तो पुढे असेही म्हणाला की, त्याला सलमान खानसाठी चित्रपटात गाणे गायला आवडेल.
Our pawandeep with with tiger khan ❤@RajanPawandeep @BeingSalmanKhan #PawandeepRajan #SalmanKhan pic.twitter.com/zlYnsG3hA0
— Sara Khan (@SK_serendipity) August 17, 2021
पवनदीपने या मुलाखतीत असेही सांगितले होते की, “विजेत्याची ट्रॉफी हातामध्ये पकडणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पण माझी इच्छा आहे की, मला माझ्या पाचही अंतिम स्पर्धकांसोबत ट्रॉफी शेअर करायची आहे. माझ्यासाठी आता ही एक संमिश्र भावना आहे. मला माहित आहे की, प्रत्येकजण इतका प्रतिभावान आहे, तर पुढे जाऊन आम्ही सर्वजण लवकरच उत्तम करिअर बनवणार आहोत. जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल, तेव्हा आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत.” इंडियन आयडल १२ मध्ये पवनदीप राजन जिंकला आणि २५ लाख रुपये, एक कार आणि ट्रॉफी जिंकली आहे.
त्याचबरोबर वाढदिवसाच्या पार्टीबद्दल बोलायचे झाले, तर सर्व स्पर्धकांनी सलमान खानसोबत खूप मजा केली आणि फोटोही काढले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-