मोठ्या विश्रांतीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय फरदीन खान; ‘या’ चित्रपटासह येणार चाहत्यांच्या भेटीला


एका कलाकारामधील कला कितीही मोठा ब्रेक घेतला, तरी तशीच असते. त्याच्यातील कलेला कोणीच मारू शकत नाही. अनेक कलाकार हे आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींमुळे चित्रपटांपासून थोडे दूर गेलेले असतात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी या आधी प्रेक्षकांची मने जिंकल्यामुळे, त्यांचे चाहते कायमच त्यांची आणि त्यांच्या धडाकेबाज अभिनयाची वाट पाहत असतात. अशात गेले अनेक दिवस सिनेसृष्टीमधून गायब झालेला अभिनेता फरदीन खान आता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार आहे.

बॉलिवूडमधील अभिनेता फरदीन खान रुपेरी पडद्यापासून बरेच दिवस दूर होता. परंतु आता तब्बल ११ वर्षांनंतर त्याचा चित्रपट पाहायला मिळणार, म्हणून त्याचे चाहते खूप खुश आहेत. लवकरच तो त्याच्या आगामी चित्रपटामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Fardeen Khan to make a comeback with Sanjay Gupta’s visfot movie)

‘विस्फोट’ चित्रपटामध्ये झळकणार फरदीन खान
फरदीन साल २०१० मध्ये ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर झळकला होता. आता अकरा वर्षांच्या विश्रांतीनंतर तो ‘विस्फोट’ या चित्रपटामध्ये रितेश देशमुखसह झळकणार आहे. आतापर्यंत या दोघांनी अनेक वेळा एकत्र काम केले आहे.

चित्रपट निर्माते संजय गुप्ता त्यांच्या ‘विस्फोट’ या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी यासाठी रितेश आणि फरदीनची नेमणूक केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की, “फरदीन खान या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पुन्हा दिसणार आहे. सर्व काही ठीक राहीलं, तर या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ आम्ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटीच करणार आहोत. रितेश आणि फरदीन या दोघांनी देखील त्यांची स्क्रिप्ट वाचलेली आहे आणि ते दोघेही अभिनय करण्यास उत्सुक आहेत. तुम्ही आजवर त्यांना ज्या भूमिकांमध्ये पाहिले नसेल, त्या भूमिका ते या चित्रपटामध्ये साकारणार आहेत. मी देखील त्यांच्याबरोबर काम करण्यास खूप उत्सुक आहे.”

या दोन्ही कलाकारांनी या आधी साल २००७ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बेबी’मध्ये धमाल केली होती. त्यांच्या अभिनयाने त्यांनी चाहत्यांची मने जिंकली होती. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेमध्ये होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा

-‘शिवगामीदेवी’ची भूमिका साकारून मेगास्टार झाल्या रम्या; बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्ससाठी सतत असायच्या चर्चेत

-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे


Leave A Reply

Your email address will not be published.