किती ते मोठेपण! ‘सनम तेरी कसम’ फेम अभिनेता कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे; विकतोय स्वत:ची बाईक

Actor Harshvardhan Rane sell his bike to help covid-19 patients


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस हा विषाणू खूप वेगाने संक्रमण करत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या लाखोंमध्ये वाढत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देत आहेत. तरीही नागरिकांनी सगळ्या सूचनांचे पालन न केल्याने आता महाराष्ट्र शासनाने जनतेच्या सुरक्षिततेसाठी पर्यायाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. रुग्णांना वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने त्यांचा जीव जात आहे. सरकारसोबत अनेकजण देशाला या संकटातून वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे देखील कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. त्याने ऑक्सिजन पुरवण्यासाठी फंड जमा करण्यासाठी त्याची गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या गाडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून माहिती दिली आहे.

हर्षवर्धनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर गाडी साफ करताना एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, “मी माझी मोटार सायकल ऑक्सिजन कंसंट्रेटर्सच्या बदल्यात देत आहे. हैद्राबादमध्ये चांगले कंसंट्रेटर्स शोधण्यासाठी कृपया मला मदत करा.”

‘सनम तेरी कसम’ आणि ‘पलटण’ या चित्रपटासाठी ओळखला जाणारा अभिनेता हर्षवर्धन याआधी शेवटचा ‘तैश’ या चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर झी 5 वर प्रदर्शित झाला होता. मागच्या वर्षी त्याला कोरोनाची लागण झाली होती. जेव्हा तो तैश चित्रपटाचे डबिंग करत होता, त्यावेळी तो आयसीयूमध्ये होता.

हर्षवर्धनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच जॉन अब्राहम याच्या प्रॉडक्शनमधील चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटबाबत बोलताना जॉनने सांगितले होते की, “आम्ही एक नवीन चित्रपट तारा वर्सेस बिलालची सुरुवात करत आहोत. एका सुंदर आयुष्याकडून प्रेरित हा चित्रपट बनवला जात आहे. या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि आगीरा धर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग मे महिन्यात सुरू केली जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समर शेख करणार आहेत.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळीज तोडणारी बातमी! अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

-कोरोना काळात औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर संतापला अभिनेता आर माधवन; म्हणाला…

-‘कपडे काढ, मग कळेल तू भूमिकेसाठी योग्य आहेस की नाही!’ ग्लॅमरच्या विश्वाबद्दल अभिनेत्रीने केला मोठा खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.