मनोरंजनविश्वात पदार्पणासाठी सज्ज असणाऱ्या बाबिलला सुतापा यांनी दिली जीवनाची सरावात मोठी शिकवण


इरफान खानच्या निधनाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला असला तरी त्याचे चाहते आजही त्याची आठवण करतात. इरफानच्या कुटुंबाला तर सर्वात जास्त कमतरता जाणवत आहे. इरफानचा मुलगा बाबील वडिलांशी संबंधित आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता बाबील चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अलिकडेच, इरफानची पत्नी आणि बाबीलची आई सुतापा सिकंदर या सिंगल पॅरेंटिंगवर बोलल्या आणि इरफानशी संबंधित आठवणीही सांगितल्या.

सुतापा यांनी आपल्या मुलाच्या आगामी ‘द रेल्वे मॅन’ या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “या महिन्यात माझ्या मुलाने शूटिंग सुरू केले. मी माझा मुलगा बाबीलबद्दल खूप आनंदी आहे. मी हे थोडे उशिरा शेअर करत आहे पण तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, सिंगल पालकत्व सोपे नाही. हे खूप कठीण आहे. विशेषत: अशा मुलांसाठी ज्यांना २१ वर्षांपर्यंत दोन्ही पालकांचा आधार मिळाला. पण मी असंही म्हणेन की, ते अशक्यही नाही.”

पुढे सुतापा बाबीलला म्हणाल्या, “माझ्या मुला, मला माफ कर. माझ्या आयुष्यातील ३० वर्षे एका लिजेंडसोबत शेअर केल्यानंतर, भावनिक आणि स्पिरीचुअली माझा स्टँडर्ड खूप वाढला आहे. मला तुला घाबरवायचे नाही आणि तुझ्यावर कोणतेही ओझे टाकायचे नाही. पण मी तुला याची आठवण करून देऊ इच्छिते आणि जसे बाबांनी सुद्धा सांगितले होते की, मी खूप कठोर क्रिटिक आहे. तू नुकतीच सुरुवात केली आहेस बाळा. तुझ्या मेहनतीने मी आनंदी आहे. मला माहित आहे की, तू या चित्रपटातील कलाकारांसोबत काम करून खूप आनंदी आहेस आणि या चित्रपटातून बरेच काही शिकण्यास उत्सुक आहेस. तसेच,पोस्टरमधील तुझा लूक पाहून मला खूप आनंद झाला.”

शेवटी सुतापा बाबीलशी फार घाई न करण्याबद्दल सांगताना म्हणाल्या, “तू तुझ्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याची घाई करू नको.” आईच्या या पोस्टवर बाबीलची प्रतिक्रियाही आली आहे. त्याने लिहिले की, “ओह तेरी.” ‘द रेल्वे मॅन’ हा यशराज फिल्म्सचा पहिला ओटीटी वेंचर आहे. हा चित्रपट १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आहे. बाबील व्यतिरिक्त या चित्रपटात के.के. मेनन, आर. माधवन आणि दिव्येंदू सारखे दिग्गज कलाकार आहेत.

हेही वाचा-

Video: माधुरी दीक्षितने ‘लेझी लॅड’ गाण्यावर दाखवले भन्नाट मूव्ह्ज, एक्सप्रेशन्सही आहेत कमाल!

कधी वाळवंट, तर कधी समुद्रामध्ये रोमान्स करताना दिसली अंकिता; रोमँटिक प्री-वेडिंग शूट आले समोर

दोन हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात करणारे रजनीकांत आज आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक


Latest Post

error: Content is protected !!