चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या अभिनयासोबतच आपल्या कठोर स्वभावासाठीही ओळखले जातात. कधी कधी हे कलाकार आपल्या चाहत्यांसोबत केलेल्या कृत्यामुळे भलतेच चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. यामध्ये बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचादेखील समावेश आहे. जॉनला त्याच्या वेगवेगळ्या अभिनयासाठी ओळखले जाते. कॉमेडीपासून ते देशभक्तीपर चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो मागील काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. मात्र, असे असूनही त्याच्या चाहत्यांमध्ये तिळमात्र घट झालेली नाही. जॉनसोबत जेव्हा कोणी चर्चा करतात, तेव्हा त्यांच्याशी तो खूपच आदराने वागतो. मात्र, एक वेळ अशी होती, जेव्हा सतत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांशी तो गैरवर्तन करताना दिसला होता.
खरं तर, जॉनचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जॉन आपल्या एखा चाहत्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण झाला आणि सोशल मीडियावर त्याच्या या वर्तनासाठी त्याच्याप्रती नाराजी व्यक्त करण्यात आली होती. (Actor John Abraham Misbehave With Fan People Said On Social Media Actor Lost Respect In Their Eye)
जॉनने दिला चाहत्याला धक्का
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जॉनकडे एक चाहता आनंदी होऊन सेल्फी घेण्यासाठी येतो. मात्र, जॉन आपल्या या चाहत्याला धक्का देऊन जमिनीवर पाडतो. त्या चाहत्याला जॉनचा एवढा जबर धक्का बसतो की, तो थेट जमिनीवर पडतो. त्यानंतर जॉन त्याच्याकडे पाहतो, पण त्याला उचलत नाही. जॉनची चाहत्याप्रती हे गैरवर्तन निश्चितच नेटकऱ्यांच्या गळ्याच्या खाली उतरले नाही. त्यानंतर त्यांनी जॉनला ट्रोल केले.
John Abraham fight with his fans pic.twitter.com/EqGzwwHvno
— Rasik ???? (@Ras_Ekk) July 7, 2018
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केले ट्रोल
जॉनचा हा व्हिडिओ पाहून सोशळ मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “याला इतका भाव नका देऊ. खरे हिरो तर सैनिक आणि शेतकरी आहेत. त्यांच्यासोबत सेल्फी घ्या.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “या व्हिडिओनंतर जॉनने आपल्या चाहत्यांना गमावले आहे. मला वाटले होते की, तो बॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहे.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “मी त्याचे हे गैरवर्तन पाहण्यापूर्वी त्याचा खूप मोठा चाहता होतो.”
प्रेक्षकांसोबत अनेकदा केले गैरवर्तन
प्रेक्षकांसोबत गैरवर्तन करण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही जॉनने एका चाहत्याच्या डोक्यावर जोरात मारले होते. याव्यतिरिक्त एकदा स्टेडिअममध्ये पोहोचल्यानंतर जॉनने एका चाहत्याला धक्का दिला होता. यानंतर जॉनने विमानतळावरही एका चाहत्याला अशाच प्रकारे धक्का देऊन बाजूला केले होते. केवळ पुरुषांनाच नाही, तर एका महिला चाहतीलादेखील त्याने गाडीत बसण्यापूर्वी धक्का दिला होता.
सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
जॉनचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ मिलियनपेक्षाहीी अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रत्येकजण जॉनच्या या गैरवर्तनासाठी त्याच्यावर टीका करत आहेत.
त्याच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘मुंबई सागा’ आणि ‘अटॅक’ चित्रपटात झळकला होता. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘एक व्हिलन २’ आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी
-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’