Thursday, September 28, 2023

ऑस्ट्रेलियातील चाहतीने कार्तिकसाठी उघडले प्रेमाचे दरवाजे, सर्वांसमोर घातली लग्नाची मागणी; पाहा व्हिडिओ

कोणाचाही पाठीवर हात नसताना बॉलिवूडमध्ये टिकणे आणि ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा कलाकार बनणे, ही सोपी गोष्ट नसते. मात्र, हे काम तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेला अभिनेता कार्तिक आर्यन याने लीलया पार पाडले. कार्तिक याने एकापेक्षा एक सिनेमे देत चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकताच अभिनेत्याचा ‘सत्यप्रेम की कथा‘ सिनेमा रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. अशात आता कार्तिक मेलबर्न येथे आयोजित भारतीय चित्रपट महोत्सवाचा भाग बनण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता. यादरम्यान अभिनेत्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. यावेळी त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. यादरम्यानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात कार्तिक आर्यनला महिला चाहतीने लग्नासाठी प्रपोज केले. हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मेलबर्न येथे कार्तिक आर्यन याच्या ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) या हिट सिनेमाला प्रेक्षकांकडून वाहवा मिळाली. यादरम्यान चाहत्यांना गर्दी केलेल्या थिएटरमध्ये जशी कार्तिकची एन्ट्री झाली, तसे टाळ्यांच्या कडकडाटासह त्याचे स्वागत झाले. विशेष म्हणजे, त्याला पाहून एका महिला चाहतीचे नियंत्रणच सुटले.

ट्विटरवर व्हिडिओ व्हायरल
खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये खास स्थान निर्माण करणाऱ्या कार्तिकच्या ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली. जवळपास 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल 80 कोटींची कमाई केली आहे. तसेच, मेलबर्न येथे झालेल्या स्क्रीनिंगदरम्यान एका चाहतीने अभिनेत्याला मागणी घातली. खरं तर, मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात कार्तिकसाठी प्रश्नोत्तराचे सत्रही आयोजित केले होते. यादरम्यान एका महिला चाहतीने अभिनेत्याला सर्वांसमोर लग्नासाठी मागणी घातली. यादरम्यानचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.

महिला चाहतीचा मजेशीर प्रश्न
ट्विटरवर कार्तिक आर्यनचा व्हिडिओ सर्वांची मने जिंकत आहे. एका व्हिडिओत अभिनेता चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. जसा माईक एका मुलीकडे जातो, तेव्हा ती कार्तिकला लग्नाबाबत प्रश्न विचारते. चाहती म्हणते की, “मला माहिती आहे की, मला पुन्हा हा प्रश्न विचारण्याची संधी मिळणार नाही. मात्र, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?” या मुलीच्या प्रपोजलपूर्वी अभिनेता तिला लक्ष देऊन ऐकत असतो. मात्र, चाहती जशी लग्नासाठी प्रपोज करते, तो लाजतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. मात्र, याव्यतिरिक्त इतर अनेक चाहते अभिनेत्याला वेगवेगळे प्रश्न विचारली, ज्याची उत्तरे अभिनेत्याने मनमोकळेपणाने दिली. (actor kartik aaryan gets the cutest marriage proposal from a fan in austalia)

महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ‘बिग बॉस 13’ Paras Chhabraने सिक्स पॅक ऍब्जसाठी घेतले होते स्टेरॉईड? अभिनेत्याचा खुलासा
करण कुंद्रासोबतच्या नात्यावर स्पष्टच बोलली अभिनेत्री; म्हणाली, ‘माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता…’

हे देखील वाचा