कुठल्याही गॉडफादरशिवाय म्हणजेच पाठीवर कुणाचाही हात नसताना बॉलिवूडमध्ये स्थान मिळवणे ही खूप कठीण गोष्ट आहे. मात्र, ही कठीण गोष्टही साध्य करण्याचे कसब खूप कमी अभिनेत्यांकडे आहे. त्यापैकीच एक म्हणजे कार्तिक आर्यन होय. कार्तिकने खूप परिश्रमानंतर यशाचे शिखर गाठले आहे. त्याने अभिनयाच्या जोरावर कोट्यवधी चाहतावर्ग निर्माण केला. अशात तो सध्या त्याच्या ‘शहजादा‘ सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. तो सिनेमाच्या प्रमोशनसाठी इकडे-तिकडे फिरताना दिसत आहे. यादरम्यान त्याने त्याच्या लाईफ पार्टनरविषयी असे वक्तव्य केले आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ असणाऱ्या कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मात्र, कार्तिकचे प्रेम तर दुसऱ्यावरच आहे. ते म्हणजे त्याच्या पाळीव कुत्रीवर. अभिनेत्याचे म्हणणे आहे की, त्याची व्हॅलेंटाईन ही इतर कुणी नसून त्याची कुत्रीच आहे. तो म्हणाला की, त्याची कुत्री कटोरी त्याच्यावर बिनशर्त प्रेम करते आणि असे प्रेम त्याच्यावर कुणीही करू शकत नाही.
View this post on Instagram
एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्याने सांगितले की, त्याला लाईफ पार्टनर कसा पाहिजे. यावर कार्तिकने मजेत म्हटले की, “कटोरी मला जेवढे बिनशर्त प्रेम करते, तेवढेच प्रेम तिने द्यावे.”
View this post on Instagram
कटोरीचे प्रेम बिनशर्त
यादरम्यान कार्तिक म्हणाला की, “जर मी नात्यात असेल आणि हे कोणत्याही प्रकारचे नाते असू शकते, तेव्हा मी त्यामध्ये खूप गुंतवणूक करतो. मी इतका डुंबलो आहे की, मला वाटते की, मी कामाकडे दुर्लक्ष करू शकतो. हे असे असू शकते, जे मी भविष्यात संतुलित करण्याचा प्रयत्न करतो. ही एक कमजोरी असू शकते.”
कार्तिक अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या कटोरी या कुत्रीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. इतकेच नाही, तर कटोरीसाठी त्याने एक स्वतंत्र अकाऊंटही सुरू केले आहे. त्याच्या कुत्र्याने जानेवारीच्या अखेरीस वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी कार्तिकनेन एक खास पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने कटोरीला शुभेच्छा देत लिहिले होते की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी टोकरी-कटोरी.”
इतकेच नाही, तर कार्तिकने मागील वर्षी एका गोष्टीचा खुलासा केला होता की, पूडल नावाचे त्याने कटोरी का ठेवले. त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “तो कटोरी आर्यन आहे. कारण, जेव्हा ती घरी आली होती, तेव्हा एका कटोरीसारखी दिसत होती. इतकी छोटीशी आणि कटोरीसारखीच होती. त्यामुळे तिचे नाव कटोरी ठेवले, तिचा हेअरकटही कटोरीसारखाच आहे.”
‘शहजादा’ सिनेमा रिलीजसाठी सज्ज
सध्या आगामी ‘शहजादा’ या सिनेमासाठी कार्तिक खूपच व्यस्त आहे. तो त्याच्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रोहित धवन यांनी केले आहे. हा सिनेमा येत्या 17 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या रिलीजपूर्वी अभिनेता देशभरातील मॉल, क्लब आणि इतकेच नाही, तर क्रितीसोबत ताजमहल सारख्या ऐतिहासिक ठिकाणांनाही भेट देऊन सिनेमाचे प्रमोशन करत आहे.
‘शहजादा’ हा सिनेमा 2020मध्ये रिलीज झालेला तेलुगू सिनेमा ‘अला वैकुंठपुरमुलू’चा रिमेक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कार्तिकने सांगितले आहे की, शहजादा हे एकसारखा रिमेक नाहीये. दिग्दर्शक रोहितने सिनेमाला बॉलिवूड प्रेक्षकांसाठी अधिक आकर्षित करण्यासाठी खासकरून लक्ष घातले आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (actor kartik aaryan on his life partner you will be surprised to hear this thing read here)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टायगरने दाखवले जबरदस्त मसल्स, पण नेटकऱ्यांकडून झाला भलताच ट्रोल; म्हणाले, ‘पँट वर कर…’
बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या नवीन सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पती निकचाही असणार कॅमियो