ट्रोल केले जाते, तेव्हा आईला कशाप्रकारे समजावतो कार्तिक? मुलाखतीदरम्यान केले स्पष्ट


प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मागील काही दिवसांपूर्वी तो पाचगणीत रस्ता चुकल्यामुळे चर्चेत आला होता. त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला आपल्या आलिशान गाडीवर वडापाव खाताना दिसला होता. यानंतर तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. कार्तिकचा आगामी ‘धमाका’ हा चित्रपट १९ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तो आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. नुकतेच कार्तिकने एका मुलाखतीत सांगितले होते की, एका खोलीत झाली आहे. अशातच त्याने सांगितले आहे की, जेव्हा त्याला ट्रोल केले जाते, आणि त्याच्यावर टीका होते, तेव्हा तो आपल्या आईला कशाप्रकारे समजावून सांगतो.

खरं तर, कार्तिक आपल्या आईवर खूप प्रेम करतो. तो आपल्या आईवर प्रेम व्यक्त करताना कधीही मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असणाऱ्या कार्तिकच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओमध्ये त्याच्या आईचीही झलक पाहायला मिळते. (Actor Kartik Aaryan Says Controverias Affect Families Mummy Ko Bahut Samjhata Hu)

तो लवकरच त्याच्या कारकिर्दीतील पहिला थ्रिलर चित्रपट ‘धमाका’मध्ये दिसणार आहे. तो वाद कसे हाताळतो हे त्याने सांगितले आहे. कार्तिक म्हणतो की, “काही वेळा गोष्टी एकाच्या दोन करून सांगितल्या जातात, तेव्हा त्याचा काही प्रमाणात परिणाम होतो की असे का होत आहे? अशा परिस्थितीत मला माझ्या कुटुंबाचे वाईट वाटते. कारण, ते या जगाचे म्हणजे इंडस्ट्रीचे नाहीत. मात्र, मी याचा एक भाग आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी चित्रपट उद्योगातील आहे आणि मला माहित आहे की, काहीही फरक पडत नाही आणि तुम्हाला फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, परंतु काही वेळा कुटुंबे प्रभावित होतात. मला कधी कधी हीच काळजी वाटते. त्याशिवाय, काही फरक पडत नाही.”

“मला माहित आहे की, माझे काम नेहमीच बोलते. मी कुठेतरी मागे पडत असल्यास, मला त्यात सुधारणा करायची आहे.” घरच्यांना परिस्थिती समजावून सांगितली का, असे विचारले असता. कार्तिक म्हणाला, “हो मी खूप समजावतो… आईला खूप समजावतो.”

कार्तिकने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन २०११ मध्ये आलेल्या ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून झाली होती. तो शेवटचा सन २०२०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात झळकला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मेहुणा आयुष शर्माला सलमान खानसोबत ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये करायचे नव्हते काम, केला खुलासा

-श्रद्धा आर्याला उचलून घेऊन मंडपात पोहोचला पती राहुल, वधू-वरावर खिळल्या सर्वांच्याच नजरा

-वीर दासच्या वक्तव्यावर भडकली कंगना; थेट दहशतवादाशी तुलना करत, केली कडक कारवाईची मागणी


Latest Post

error: Content is protected !!