वीर दासच्या वक्तव्यावर भडकली कंगना; थेट दहशतवादाशी तुलना करत, केली कडक कारवाईची मागणी


कॉमेडियन वीर दास हा भारतातील महिलांच्या स्थितीवर केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे वादात सापडला आहे. त्याने माफी मागणारे वक्तव्य जारी केले असले, तरी अभिनेत्री कंगना रणौतने वीर दासवर निशाणा साधला आहे. तिने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने वीर दासच्या कामाची तुलना थेट दहशतवादाशी केली आहे.

आपल्या या भल्यामोठ्या पोस्टमध्ये कंगना रणौतने लिहिले की, “जेव्हा तुम्ही सर्व भारतीय पुरुषांना गँग-रेपिस्ट म्हणून सामान्यीकृत करता, तेव्हा ते जगभरातील भारतीयांविरुद्ध वर्णद्वेषाला प्रोत्साहन देते. चर्चिलने बंगालमधील दुष्काळात मदत करण्याबाबत झालेल्या विचार चर्चेदरम्यान, भारतासाठी कोणतीही मदत अपुरी पडेल, असे म्हटले होते. कारण भारतीय सशासारखे बाळ जन्माला घालतात. त्यांना अशा प्रकारे मरणे बंधनकारक आहे. भुकेमुळे लाखो लोकांच्या मृत्यूसाठी त्यांनी भारतीयांच्या प्रजननक्षमतेला जबाबदार धरले. संपूर्ण जातीला लक्ष्य करणारे असे विधायक कृत्य दहशतवादापेक्षा कमी नाही. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हायला हवी.” (kangana ranaut wants action against vir das viral video)

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

काय म्हणाला होता वीर दास
सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये वीर दासने देशाच्या दुहेरी स्वभावाचा उल्लेख केला आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये वीर दास असे म्हणताना ऐकू येतो, “मी अशा भारतातून आलो आहे जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री रेप होतो. मी भारतातून आलो आहे जिथे तुम्ही AQ1 9000 आहात, तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. मी भारतातून आलो आहे जिथे आपण शाकाहारी असल्याचा अभिमान बाळगतो पण त्याच शेतकऱ्यांना त्रास देतो.”

कोमेडियनवर गुन्हा दाखल
वीर दासला आता अपमानास्पद शब्दांमुळे विरोध होत आहे. लोक त्याला ‘देशद्रोही’ म्हणत आहेत. एवढेच नाही तर भाजप कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनीही हा व्हिडिओ शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे. देशाबद्दलचे हे विधान घृणास्पद आणि मूर्खपणाचे असल्याचे त्यांनी लिहिले आहे. या विधानाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशुतोष जे दुबे यांनी कॉमेडियनविरोधात तक्रार दाखल केली, ज्याची एक प्रत त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिवसा पूजा केली जाते, तर रात्री महिलांवर…’, वादग्रस्त विधानानंतर कॉमेडियन वीर दासने दिले स्पष्टीकरण

-Jai Bhim: चित्रपटावरून झालेल्या वादामुळे सूर्याला मिळतायत धमक्या, घराबाहेर पोलीस तैनात

-बायकोची प्रगती बघवेना, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याकडून पत्नीला मारहाण; कौटुंबिक हिंसाचार केल्याबद्दल गुन्हा दाखल


Latest Post

error: Content is protected !!