सुपरस्टार ऋतिक रोशनच्या डेब्यू वेबसीरिजमध्ये काम करण्यास मनोज वाजपेयींचा नकार; मोठे कारण आले समोर

Actor Manoj Bajpayee Steps Back of Hrithik Roshan Starrer The Night Manager Hindi Remake


नुकतीच बहुप्रतिक्षित ‘द फॅमिली मॅन २’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. यातील मुख्य भूमिका साकारलेले अभिनेते मनोज वाजपेयी चांगलेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर या वेबसीरिजचे प्रदर्शन थांबवण्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रदर्शनानंतर या सीरिजसाठी मनोज यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अभिनेत्याकडे बरेच प्रोजेक्ट आहेत. अशातच वृत्त आले होते की, मनोज सुपरस्टार ऋतिक रोशनच्या डिजिटल पदार्पणाच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. मात्र, आता मनोज यांनी या वेबसीरिजमधून माघार घेतली आहे.

टॉम हिडलेस्टन यांच्या ‘द नाईट मॅनेजर’साठी निर्मात्यांनी मनोज यांना हत्यारे विकणाऱ्या रिचर्ड रोपरची भूमिका साकारण्यासाठी चर्चा केली होती. ‘द नाईट मॅनेजर’मध्ये ही भूमिका ह्यूग लॉरी यांनी साकारली होती. दुसरीकडे टॉम हिडलेस्टन यांनी यामध्ये ‘जोनाथन पाईन’ची भूमिका साकारली होती. ऋतिक रोशन अभिनित चित्रपट ‘द नाईट मॅनेजर’ या वेबसीरिजचा हिंदी रिमेक आहे. ज्यासाठी मनोज वाजपेयींसोबत चर्चा सुरू होती.

मात्र, वाईट गोष्ट अशी की, मनोज वाजपेयी यांनी ही भूमिका साकारण्यासाठी नकार दिला आहे. मिड डेच्या वृत्तानुसार, मनोज वाजपेयी यांच्याकडे तारखा नसल्यामुळे त्यांनी या वेबसीरिजशी जोडण्यास नकार दिला आहे. यामुळेच ते आता ऋतिक रोशनच्या पदार्पणाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार नाहीत.

मिड डेशी चर्चा करताना मनोज वाजपेयी यांच्याशी जोडलेल्या एका सूत्राने सांगितले की, “मनोज सर सीरिजसाठी चर्चा करत होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांच्या दोन प्रोजेक्ट्सला आधीच उशीर झाला होता. ते सध्या उत्तराखंडमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. यानंतर ते आपल्या उर्वरित प्रोजेक्ट्सची शूटिंग करतील. अशामध्ये त्यांना जाणवले की, सीरिजसाठी त्यांच्याकडे निर्मात्यांनुसार तारीख नसेल. या कारणामुळे त्यांनी या प्रोजेक्टला नकार दिला.”

सर्वकाही व्यवस्थित राहिलं, तर ही वेबसीरिज वर्षाच्या शेवटी डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.