Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड ‘आदिपुरुष’वर झालेल्या गदारोळात क्रितीच्या आईने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मानवी भावना समजून…’

‘आदिपुरुष’वर झालेल्या गदारोळात क्रितीच्या आईने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मानवी भावना समजून…’

क्रिती सॅनन, प्रभास आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष‘ हा चित्रपट लोकांच्या निशाण्यावर आहे. चित्रपटातील संवाद आणि व्यक्तिरेखा यावर सातत्यानं टिका हाेत असल्याचं बघायला मिळत आहे. अशात चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादावर आता क्रिती सेनॉनच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

रिलीज झाल्याच्या दिवसापासून ‘आदिपुरुष’ चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनाही पोलिसांकडून सुरक्षा घ्यावी लागली आहे. रिलीजपूर्वी चित्रपटाचे मुख्य कलाकार क्रिती सेनन आणि प्रभास जोरदार प्रमोशन करत होते. मात्र, आता दोघेही गप्प बसले आहेत. अशात अभिनेत्रीची आई गीता सेनन या पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहे.

क्रिती सेनन हिची आई गीता सेनन यांनी बुधवारी (21 जुन)ला त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पाेस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या, ‘मानवी चुका नाही, तर भावना समजून घेतल्या पाहिजेत.’ पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ”जय श्री राम जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी… याचा अर्थ असा की, जर तुम्ही चांगल्या विचाराने आणि दूरदृष्टीने पाहिले तर विश्व सुंदर दिसेल! प्रभू रामांनी आपल्याला शबरीच्या बोरांमध्ये प्रेम पाहायला शिकवले आहे, ते उष्टे होते, हे नाही. त्यामुळे माणसाच्या चुका नाही, त्यांच्या भावना समजून घ्या… जय श्री राम.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Sanon (@geeta_sanon)

क्रिती सेनाॅननेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या आईची ही पोस्ट शेअर केली आहे. अशात साेशल मीडिया युजर्सने अभिनेत्रीच्या या पेास्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करतन एका युजरने म्हटले की, “मी क्रिती सेनॉनची खूप मोठी फॅन आहे, पण जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. त्यांनी प्रेक्षकांचा आदर केला पाहिजे. कारण, ते राहिलेत नाही, तर तुमचे चित्रपट काेण पाहणार? त्यामुळे त्यांच्या शब्दांचा आदर करा.” अशात आणखी एका युजरने म्हटले की, “मॅडम पैसे कमावण्यासाठी सर्व गाेष्टीना याेग्य मानले जाऊ शकत नाही… किमान धर्म या सगळ्यापासून दूर ठेवा… त्यांनी पैसे कमवण्यासाठी धर्माचा वापर केला, पण त्याचा आदर केला नाही… त्यांना लाज वाटली पाहिजे आणि माफी मागितली पाहिजे.” अशा प्रकरे साेशल मीडिया युजर्स या पाेस्टवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत. (adipurush controversy kriti sanon mother geeta sanon reacts on social media)

अधिक वाचा –
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
Birth Anniversary| भारदस्त आवाज, दमदार संवाद, नायकावरही भारी पडणारा असा हा खलनायक पुन्हा होणे नाही

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा