Friday, April 26, 2024

पवन कल्याण अन् राणा डग्गुबतीचा ‘भीमला नायक’ संक्रांतीला रिलीझ होण्यासाठी सज्ज, ‘आरआरआर’ला देणार टक्कर

पवन कल्याण आणि राणा डग्गुबती अभिनित तेलुगू चित्रपट ‘भीमला नायक’ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा मल्याळम ब्लॉकबस्टर ऍक्शन थ्रिलर अय्यप्पनम कोशियुमचा तेलुगू रिमेक आहे. ज्यामध्ये बिजू मेनन मुख्य भूमिकेत होता. गेल्या काही दिवसांपासून ‘भीमला नायक’च्या संदर्भात, ‘बाहुबली’ फेम एसएस राजमौलीच्या ‘आरआरआर’शी टक्कर टाळण्यासाठी निर्माते त्याची प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलतील असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, आता ‘भीमला नायक’च्या निर्मात्यांनी याचा स्पष्ट नकार दिला आहे. मंगळवारी (१६ नोव्हेंबर) ट्विटरवर माहिती देताना निर्मात्यांनी जाहीर केले की, चित्रपट नियोजित तारखेला प्रदर्शनासाठी तयार आहे.

निर्मात्यांनी आधीच माहिती दिली आहे की, ‘भीमला नायक’ १२ जानेवारी, २०२२ रोजी संक्रांतीच्या आसपास प्रदर्शित होईल आणि त्यांनी पुन्हा एकदा याची पुष्टी केली आहे. रामचरण- ज्युनियर एनटीआर अभिनित ‘आरआरआर’ ७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे आणि ‘भीमला नायक’ १२ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अशा स्थितीत दोन्ही चित्रपटांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते.

‘भीमला नायक’मधून कल्याण आणि डग्गुबती पहिल्यांदाच दिसणार एकत्र
‘भीमला नायक’मध्ये ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबती पहिल्यांदाच पवन कल्याणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात तो एका निवृत्त हवालदाराच्या भूमिकेत दिसणार आहे, तर कल्याण एका धाडसी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री नृत्या मेनन आणि संयुक्ता मेनन देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘भीमला नायक’ सागर के चंद्रा दिग्दर्शित करत आहेत आणि सितारा एंटरटेनमेंट्सच्या बॅनरखाली बनत आहे, तर संगीत एस. थमन यांचे आहे.

खऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी आहे ‘भीमला नायक’
स्वातंत्र्यलढ्यात १८५७ मध्ये योगदान देणाऱ्या खऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात भीमा नायक इंग्रजांविरुद्ध लढले. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर गुन्हा सिद्ध केल्यानंतर त्यांना पोर्ट ब्लेअर आणि निकोबारमध्ये ठेवण्यात आले होते. भीमा नायक यांचा मृत्यू २९ डिसेंबर, १८७६ रोजी पोर्ट ब्लेअरमध्ये झाला, पण देशासाठी शहीद झालेल्या या शूर सैनिकाचे योगदान विसरता येणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Jai Bhim: चित्रपटावरून झालेल्या वादामुळे सूर्याला मिळतायत धमक्या, घराबाहेर पोलीस तैनात

-सरकारचा मोठा निर्णय! पुनीत राजकुमारला मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित

-पूजा हेगडे मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो शेअर करत म्हणाली, ‘एक सामान्य मुलगी…’

हे देखील वाचा